Parbhani News : तीव्र पाणी टंचाई उद्भवल्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ४ गावांमध्ये ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर ७ तालुक्यांतील ४९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.
गतवर्षीच्या (२०२४) पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला होता. परंतु बेसुमार उपशामुळे अनेक भागातील विहिरींची पाणी पातळी जानेवारी महिन्यातच कमी झाली होती. फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात वाढ झाली. एप्रिल -मे महिन्यात जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिकच वाढला. मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पाऊस सुरु आहे. त्यामुळे तापमानात घट झाली आहे.
परंतु पाणी टंचाईची समस्या कायम आहे. जिल्ह्यातील ६६ हजार ९२४ एवढ्या लोकसंख्येसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना केल्या आहेत. त्यात जिंतूर तालुक्यातील शेवडी, वाघीधानोरा, धमधम, बोरी या ४ गावांतील ४ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात असून १४ फेऱ्या मंजूर आहेत. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम या ७ तालुक्यातील ४२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
त्यात टँकरसाठी ७ तर टँकरव्यतिरिक्त ४२ विहीरी आहेत. त्यात परभणी तालुक्यातील पेडगाव येथे १ विहिरीचे तर जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा, कोठा तांडा, धमधम, बोरी, इटोली, पोखर्णी तांडा, देवसडी, कोरवाडी, पिंपळगाव काजळे या गावातील मिळून एकूण १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
सेलू तालुक्यात गिरगाव खुर्द, गिरगाव बुद्रूक, निरवाडी बुद्रूक,नागठाण कुंभारी, कान्हड, केमापूर, रवळगाव, गव्हा या गावातील १० विहिरी, मानवत तालुक्यातील रत्नापूर आणि मानवत रोड या ठिकणी २, सोनपेठ तालुक्यातील टिकू नाईक तांडा येथे १ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
गंगाखेड तालुक्यातील वरवंटी थावरुनाईक तांडा, वरवंटी चंदूनाईक तांडा, कुंडगीरवाडी, काळीमाती तांडा, सज्जा घटांग्रा या ठिकणी ६ विहिरी तर पालम तालुक्यातील बनवस, बोरगाव खुर्द, सादलापूर, रामापूर, मोजमाबाद, पिराचा तांडा, पेमानाईक तांडा, खरब धानोरा, उमरा, हनुमाननगर, रेवा नाईक तांडा, कोनेरवाडी, महादेववाडी या ठिकाणच्या १६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.