Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पैनगंगा नदीकाठच्या ४४ गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

Painganga River Water Crisis : पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. असे असले तरी ४४ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्‍न मार्गी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : उन्हाळ्यात पैनगंगा नदी तीरावरील ४४ गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. असे असले तरी ४४ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्‍न मार्गी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या भागातील ढाणकी, बिटरगाव, खरबी, दराटी, मन्याळी, जेवली व महागाव तालुक्यातील अनेक गावांना एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून जास्त पाणी मराठवाड्यात जाते. त्यामुळे तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा ठणठणाट असतो.

पर्यायाने नदीकाठी ४४ गावांना पाणीटंचाईच्या समस्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. या गावांमध्ये सध्या भीषण पाणीसंकट निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडले जात आहे. आता नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. यामुळे १५ दलघमी एवढा पाणीसाठा या वर्षासाठी राखीव करण्यात आला आहे.

यावर कायम तोडगा काढण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. ढाणकी गावात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ नगरपंचायत प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. यासोबतच मतखंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विडूळपासून ते चातारी नदी काठावरील प्रत्येक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

या संदर्भात गावकऱ्यांनी खासदार, आमदार तसेच प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. आंदोलन केली, तरीही त्याचा काहीही फायदा झालेला नाही. पंतप्रधान यांनी ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना आणून घराघरांत पाणी पोहोचवण्याचा निश्‍चय केला. परंतु उमरखेड तालुक्यात ही योजना तरी कागदावरच दिसत आहे.

गेल्या एका वर्षापासून उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील जलजीवन योजनेचे काम ठप्प आहेत. ग्रामपंचायतींनी विहिरी अधिकृत करून पाणीटंचाई निवारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सुद्धा पुरेसा नाही. तालुक्यातील मतखंड भागातील गावकऱ्यांनी या संदर्भात इसापूर प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडावे, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : एक ऑगस्टपासून पीककर्ज प्रक्रिया ऑनलाइन

Ujani Dam Water Discharge : उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढवला

Maize Sowing : देशात मका लागवड १५ टक्क्यांनी वाढली

Dragon Fruit Rate : पहिल्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री अंतिम टप्प्यात

Heavy Rainfall Maharashtra : मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT