Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Loss : पावसाने वाहून गेले सात क्विंटल सोयाबीन

Heavy Rain Crop Damage : खटाव व पश्चिमेकडील अनेक गावांत होत असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Satara News : खटाव व पश्चिमेकडील अनेक गावांत होत असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने घेवडा व सोयाबीनचे अधिक नुकसान झाले आहे. सलग तीन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाने येरळा नदीला व आजूबाजूच्या गावातील ओढे-नाल्यांना पूर येत आहे.

जाखणगाव (ता. खटाव) येथे पुराच्या पाण्याने थैमान घातले असून, शेतकरी मोहन राजाराम शिंदे यांचा कोंडार शिवारातील काढून ठेवलेली सोयाबीनची गंज ताडपत्रीसह वाहून गेल्याने हातातोंडाशी आलेले सात क्विंटल सोयाबीन पीक पावसाने हिरावून घेतले.

तालुक्यात अनेक गावांना परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे खरिपाचा हंगाम वाया गेला आहे. गुरुवारी (ता. ३) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर येऊन शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत शेताच्या बांधावर लावलेला सोयाबीनची गंज पुरात वाहून गेली.

या पावसाने घेवडा, सोयाबीन व फुलशेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेले पाच दिवस जांब, जाखणगाव, लोणी, भोसरे व जवळपासच्या वाड्यावस्त्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.

ओढ्यावरील फरशी पुलाचा वरचा भाग चाटून गेला आहे, तर अनेक ठिकाणी ओढ्याच्याकडेची शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासनाने पंचनाम्यात वेळ न घालवता शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: मुदखेड, धर्माबाद, किनवट, अर्धापूर, बिलोली तालुक्यांत पावसाची हजेरी

Farm Loan Waiver: हिंगोली जिल्हा बॅंकेअंतर्गत ९०८ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती

Additional Tehsil Office: उत्तर सोलापुरातील वडाळ्यात ‘अपर तहसील कार्यालय’ मंजूर

Public Protest: लाल बावट्याचा पुन्हा एल्गार

Ashadhi Wari 2026: सोलापूर जिल्हा परिषदेकडून आषाढी वारीतील विकासकामांच्या निविदांना मंजुरी

SCROLL FOR NEXT