Agriculture Science Center Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

Team Agrowon

Nashik News : मालेगाव तालुक्यांतील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल. हे संकुल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. या माध्यमातून बळीराजाला न्याय देण्याचे काम होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झाले. मुख्यमंत्री शिंदे यांचा तांत्रिक अडचणीमुळे दौरा अचानक रद्द झाल्याने काहीसा हिरमोड झाला होता. मात्र कृषी विज्ञान संकुल पाहण्यासाठी येत मालेगावकरांशी संवाद साधणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

या कार्यक्रमास खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार किशोर दराडे, मंजुळा गावित, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे, तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, की महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत वर्ष २०२०-२१ मध्ये मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली. देशातील एकमेव संकुल आहे की यामध्ये एकाच ठिकाणी ५ कृषी व संलग्न महाविद्यालये व १ कृषी तंत्रनिकेतन सुरू झाले आहे.

येणाऱ्या काळात विद्यार्थी येथे कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन यशस्वी होतील. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतिपथावर असून लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

राज्यातील कृषी शिक्षणाचा आदर्श परिसर म्हणून विकसित करणे, राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक समस्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या अध्ययन करून कृषीविस्तार, तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा प्रचार प्रसार करणे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन सोडविणे हाच कृषी विज्ञान संकुल स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे. भविष्यात कृषी व संलग्न शाखांचे पदव्युत्तर पीएच.डी. पदवी अभ्यासक्रमदेखील या कृषी विज्ञान संकुलात सुरू करण्याचे प्रस्तापित आहे. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कृषी विज्ञान संकुल हे कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार

राज्य शासनाच्या माध्यामातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मालेगाव तालुक्यातील काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मिळणार आहे. तसेच कृषी विज्ञान संकुल हे कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार असून विद्यार्थी, शेतकऱ्यांसह उत्तर महाराष्ट्रास मार्गदर्शक केंद्र ठरेल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Farmer Issue : "शेतकरी अडचणीत आला तरी मोदी त्यावर एक शब्द बोलत नाही" - नाना पटोले

SCROLL FOR NEXT