Agriculture Extension : संकल्पना चांगली, पण खुंटीला टांगली

Rural Economy : शेती विषयी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करून मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय सप्टेंबर २०२० मध्ये झाला.
Agriculture Product
Agriculture ProductAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : शेती विषयी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करून मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय सप्टेंबर २०२० मध्ये झाला. या निर्णयाला अनुसरून समित्या स्थापन ही झाल्या. मात्र, त्या समित्या नेमक्या करतात काय हे अनुत्तरीत असल्याने त्या समित्या कागदापुरत्याच मर्यादित राहिल्याची स्थिती आहे.

शेती हा ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय. शेतीवरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. दुसरीकडे हवामानातील बदल, लहरी पर्जन्यमान, कीड व रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, अचानक शेतीमालाच्या दरामध्ये घसरण आदी कारणांमुळे शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करून मार्गदर्शन होण्यासाठी ग्राम स्तरावर समितीची आवश्यकता असल्याची बाब पुढे आली होती.

Agriculture Product
Agriculture Department : पदोन्नत्या थांबवा; अन्यथा न्यायालयात जावे लागेल

त्यातूनच शासनाने ग्रामपंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी, कर्मचारी व कृषी तज्ज्ञ यांचा सहभाग असलेली एक समिती स्थापन करण्याची बाब विचारात घेतली होती. केवळ विचारापुरते मर्यादित न राहता २०२० मध्ये ९ सप्टेंबरला शासन निर्णय काढून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करणे, विविध योजना व प्रकल्प यामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनातील कलम ४९ (४) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापना संदर्भात हा निर्णय घेण्यात आला होता.

या समितीमध्ये गावातील कृषी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या किमान १२ व्यक्तींचा समावेश असावा, त्यातील अर्ध्यापेक्षा कमी नाही एवढे सदस्य महिला प्रवर्गातील असतील, असेही शासनाकडून निघालेल्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते.

Agriculture Product
Agricultural Department Employees : कृषी आस्थापना कर्मचाऱ्यांचे दहा दिवसांनंतर आंदोलन मागे

परंतु ‘संकल्पना चांगली, पण खुंटीला टांगली’ अशीच, काहीशी अवस्था ग्राम कृषी विकास समित्यांची झाल्याची दिसते. कारण या कृषी विकास समित्या आत्ताच्या घडीला कुठेच कार्यान्वित असल्याचे दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास ८७० ग्रामपंचायतमध्ये तर राज्यात जवळपास २८ हजार ग्रामपंचायतीमध्ये या समित्या स्थापन झाल्यावर होत्या. शेती हा ग्रामीण भागातील मुख्य उद्योग मानला जातो मग, अशा समित्यांचे कायम कार्यान्वयन न राहण्यामागे कारण काय हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

...अशी होती ग्राम कृषी विकास समितीची रचना

सरपंच या ग्राम कृषी विकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष तर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांचे प्रतिनिधी, महिला बचत गट प्रतिनिधी, कृषी पूरक व्यवसायातील शेतकरी, तलाठी हे या ग्राम कृषी समितीचे सदस्य असतील. शिवाय कृषी सहाय्यक सहसचिव व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी सदस्य सचिव असतील असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. याशिवाय ग्राम कृषी विकास समितीची कार्य नेमके काय असतील याचीही स्पष्टता त्या शासन निर्णयातून करण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com