Amit Shah  Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Organics : ‘भारत ऑरगॅनिक्स’ ब्रॅण्डने सेंद्रिय उत्पादनांची विक्री

Organic Produce : नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेडद्वारे (एनसीओएल) बुधवारी (ता.८) आयोजित ‘सहकारातून सेंद्रिय उत्पादनांचा प्रचार’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

Team Agrowon

Latest Agriculture News : ‘‘देशात ‘एनसीओएल’च्या माध्यमातून सहकारी तत्त्वातून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय उत्पादनांना यापुढे ‘भारत ऑरगॅनिक्स’ या एका ब्रॅण्ड खाली आणले जाईल, भारतासह जगभरात सर्वांत विश्‍वसनीय ब्रॅण्ड म्हणून तो उदयास येईल,’’ असा आशावाद केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी येथे व्यक्त केला.

नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेडद्वारे (एनसीओएल) बुधवारी (ता.८) आयोजित ‘सहकारातून सेंद्रिय उत्पादनांचा प्रचार’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी गृहमंत्री श्री. शाह यांच्या हस्ते ‘एनसीओएल’चे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, सहकार मंत्रालयाचे सचिव आणि ‘एनसीओएल’चे अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

सहकारमंत्री श्री. शहा म्हणाले, ‘‘भारतात नैसर्गिक शेती ५० टक्क्यांच्या वर नेण्याचे उद्दिष्ट बहुआयामी दृष्टिकोनाशिवाय गाठता येणार नाही. योग्य प्रमाणपत्राशिवाय शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही समस्यांना तोंड द्यावे लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील नैसर्गिक शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांच्या विपणनाची व्यवस्था करण्यासाठी नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेडची स्थापना करण्यात आली.

आज ‘भारत ऑरगॅनिक्स’ची ६ उत्पादनेही बाजारात आली आहेत. आगामी काळात भारत ऑरगॅनिक्स केवळ भारतातीलच नव्हे, तर जागतिक सेंद्रिय बाजारपेठेतील सर्वांत विश्‍वासार्ह आणि सर्वांत मोठा ब्रॅण्ड बनेल असा विश्‍वास शाह यांनी व्यक्त केला.’’

दीर्घकालीन बाजार योजना तयार करण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाद्वारे (एनपीओपी) मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असण्याची निकड सहकारमंत्री श्री. शाह यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT