Handcrafts  Agrowon
ॲग्रो विशेष

Self Employment : हस्तकलेच्या वस्तूंमधून स्वयंरोजगाराची संधी

Handcrafts : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पालघर जिल्ह्यातील अमूर्त सांस्कृतिक वारसावर आधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

Team Agrowon

Bordi News : हस्तकला प्रशिक्षण उपक्रमाला पहिल्या पर्वात महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. हा उपक्रम फक्त घोलवड ग्रामपंचायतीपुरता मर्यादित न ठेवता परिसरातील आठ ग्रामपंचायतींतील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून घरबसल्या रोजगार मिळवून देणे शक्य आहे, असा विश्वास घोलवडचे सरपंच रवींद्र बुजड यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पालघर जिल्ह्यातील अमूर्त सांस्कृतिक वारसावर आधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाकरिता ‘एमटीडीसी’ने कॉन्टॅक्ट बेस या संस्थेला समुदाय आधारित पर्यटन मॉडेल डिझाइन आणि विकसित करण्यासाठी निवड केली आहे. २० वर्षांचा अनुभव असलेल्या या संस्थेमार्फत सांस्कृतिक विकास आणि सर्वसमावेशक पर्यटन या विषयावरील तज्ज्ञांमार्फत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून १७ दिवसांत तज्ज्ञ कारागीर सुमन दास, गौतम मोदक, तुलसीराम ठाकरे, रामदास कुपाने यांच्या मार्गदर्शनाखाली घोलवड गावातील सुमारे ३५ महिलांना बुरुड कामातून विविध हस्तकला वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या वस्तूंचे प्रदर्शन गावातील शाळेच्या सभागृहात भरविण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ६० हजार हेक्टरवर

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT