Wool Crafts : लोकरीपासून बनवलेली कलाकृती, स्वदेशी उद्योगाला चालना!

Diwali Ank 2024: घोंगडी, जेनपुरत्या मर्यादित असलेल्या लोकरीपासून बारा उत्पादने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या पुणे येथील लोकर उपयोगिता केंद्रामध्ये तयार होतात.
Wool
Wool Agrowon
Published on
Updated on

Textile Products

विविध उत्पादनांची निर्मिती

घोंगडी, जेनपुरत्या मर्यादित असलेल्या लोकरीपासून बारा उत्पादने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या पुणे येथील लोकर उपयोगिता केंद्रामध्ये तयार होतात. याबाबत लोकर विणकाम विभागातील तांत्रिक सहायक अंजली धोंगडे म्हणाल्या, की सध्या राज्यात पुणे मुख्यालयासह बोंद्री (नागपूर), पोहरा (अमरावती), अंबाजोगाई (बीड), मुखेड (नांदेड), पडेगाव (छत्रपती संभाजीनगर), बिलाखेडा (जळगाव), तुळजापूर (धाराशिव), दहीवडी (सातारा), महुद (सोलापूर), रांजणी (सांगली) या ठिकाणी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र कार्यरत आहे.

यांपैकी पुणे, रांजणी आणि पडेगाव येथे दरवर्षी पाच ते दहा टन लोकरीची खरेदी होते. गुणवत्तेनुसार २५ ते ४० रुपये किलो हमीभावाने लोकरीची खरेदी होते. पुणे केंद्रामध्ये दहा, रांजणी येथे दोन आणि पडेगाव येथे दोन हातमाग विणकामासाठी उपलब्ध आहेत. आमच्या केंद्रामध्ये आलेली लोकर विलो यंत्राच्या माध्यमातून स्वच्छ करून कार्डिंग यंत्रामधून धागे सुटे केले जातात. त्यानंतर रोलर प्रेस यंत्राच्या माध्यमातून जेन आणि फायबर शीट तयार होतात.

Wool
Wool Production : लोकरी निर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण धाग्यांची गरज आणि उत्पादनाच्या संधी

खरेदी केलेली लोकर ही धागे निर्मिती करणाऱ्या कारागिरांना दिली जाते. विशेषतः राजस्थानमध्ये असे कारागीर आहेत. त्यांच्याकडून पांढऱ्या, काळ्या, निळ्या, लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे धागे पुण्यात येतात. धाग्यावर स्टार्च प्रक्रिया केल्याने धागे कडक होतात. त्यानंतर वायडिंग यंत्राने कोनावर धागे भरले जातात. ताना यंत्रावर धाग्याचे बीम भरतात. त्यानंतर विणकामासाठी हे बीम हातमागावर घेतात.

हातमागावर विणकाम करताना घोंगडी, मफलर, शाल, सतरंजी, चादर निर्मितीसाठी धाग्यांची रंगसंगती (डिझाइन) तयार करतात. पुणे येथील केंद्रामध्ये दहा हातमाग असून दहा कारागीर काम करतात. या केंद्रातील कारागीर एका दिवसात तीन घोंगडी (५ बाय ७.५ फूट), तीन चादर, दोन सतरंजी (३ बाय ६ फूट, ५ बाय ७.५ फूट, ६ बाय १० फूट), तीन शाल (३ बाय ६ फूट),

Wool
Sheep's Wool : लोकरीला मिळतोय नवा साज

चार मफलर (६ फूट), आठ पूजा आसन (२ बाय २ फूट), पाच चेअर कार्पेट (२ बाय २ फूट) तयार करू शकतात. तयार घोंगडी १२०० रुपये, जेन ९५० ते ११५० रुपये, घडीची जेन १५०० रुपये, शाल ७०० रुपये, चादर ११२० रुपये, सतरंजी १४०० ते ३००० रुपये, मफलर २०० रुपये, पूजा आसन २०० रुपये, चेअर आसन २५० रुपये, गादी १५०० ते ३१०० रुपये आणि उशी २०० रुपये या दरामध्ये उपलब्ध आहे. सर्वसामान्य लोकांना उत्पादने खरेदी करता येतील, असे दर आहेत.

या केंद्रामध्ये सर्व उत्पादने १०० टक्के लोकरीचा वापर करून तयार करण्यात येतात. जेन हा लोकरीचा लाटीव प्रकार आहे. यामध्ये लोकर आणि करंजीची पेंड वापरली जाते. यामध्ये विविध रंगसंगती उपलब्ध आहेत. घडीच्या जेनवर सुती कापडाची खोळ आणि चेन लावलेली आहे. शहरी भागात जेनला चांगली मागणी आहे. चादर थंडीत गार न पडता उबदार राहते. थंडीमध्ये पॉलिश टाइल्स गार होतात.

त्यामुळे सतरंजीला शहरी ग्राहकांनी पसंती आहे. धार्मिक कार्य, जप करण्यासाठी पूजा आसनाला मागणी आहे. लोकरीपासून तयार केलेली गादी आणि उशी मानदुखी, खांदेदुखी,पाठदुखी असणाऱ्या लोकांसाठी गुणकारी आहे. प्रवासासाठी शाल उपयुक्त आहे. विविध रंगसंगतींमध्ये मफलर उपलब्ध आहेत. सोफा सेट, चारचाकी वाहनांमध्ये सीट कव्हर म्हणून चेअर आसन वापरता येते.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com