Minister Sudhir Mungantiwar Agrowon
ॲग्रो विशेष

Sudhir Mungantiwar : राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळावर सुधीर मुनगंटीवार यांची निवड

National Fisheries development board : राज्याचे वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या नियामक मंडळावर सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

Team Agrowon

Chandrapur News : राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या नियामक मंडळावर सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. केंद्रीय मत्स्यपालन मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे घोषणा करण्यात आली.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यावर आता केंद्र सरकारच्या दोन पदांची जबाबदारी आली आहे. एप्रिलमध्ये राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली.

केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्री पुरुषोत्तम रूपाला या महामंडळाच्या अध्यक्षस्थानी आहेत. तर राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि डॉ. संजीव कुमार बालियान या दोघांकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मुनगंटीवार यांच्यासह काही मंडळींना सदस्य म्हणून मंडळावर नियुक्त केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

Farm Roads: वर्षानुवर्षे बंद असलेले ‘शिवरस्ते’ झाले मोकळे

Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त

Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Farm Pond Lining: शेततळ्याचे अस्तरीकरण कसे करावे; अस्तरीकरणासाठी शासनाकडून अनुदान किती?

SCROLL FOR NEXT