ॲग्रो विशेष

Rohini Khadse : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची वर्णी ; मुंडेंच्या विरोधकावर मोठी जबाबदारी

NCP Political Crisis : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता त्याबदल्यात त्यांच्या कन्येला मानाचे स्थान देण्यात आले असून महिला प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसेंची निवड करण्यात आली आहे.

Team Agrowon

NCP Women wing : दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. एकनाथ खडसेंनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. या बदल्यात राष्ट्रवादीत खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.

राष्ट्रवादीतील पक्ष फुटीनंतर शरद पवार राज्यभर दौरा करत आहेत. अशात पुन्हा पक्ष बांधणीकडे लक्ष देत तरुण नेत्यांना संधी देत आहेत. रोहिणी खडसे यांच्यावर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी रुपाली चाकणकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पण पक्षात फूट पडल्यानंतर चाकणकर यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून त्यांच्या गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील नेत्याला राज्य पातळीवर स्थान देण्यात आले आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणाऱ्या बबन गित्ते यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. आता याच बबन गित्ते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. शरद पवार यांच्याकडून बबन गित्ते यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं आहे. त्यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोण आहेत रोहिणी खडसे

रोहिणी खडसे - खेवलकर या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहेत. त्यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या सोबत रोहिणी खडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्या पक्ष संघटनेत सक्रिय असून विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले आहे. कापूस, केळी कांदा व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेला जनआक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला होता.महिला अत्याचारा विरोधात त्यांनी मुक मोर्चाचे आयोजन केले होते त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविल्या बद्दल रोहिणी खडसे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT