POCRA Project Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA 2.0 : पोखरा दोनमध्ये नांदेडमधील ३७५ गावांची निवड

Agriculture Project : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोखरा) दुसऱ्या टप्प्याला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Nanded News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोखरा) दुसऱ्या टप्प्याला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यात राज्यातील २१ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सहा ९५९ गावांचा समावेश आहे. यात नांदेड जिल्ह्यातील ३७५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाने नुकताच जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पात राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला.

यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश आहे.

यात अंदाजे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. प्रकल्पाच्या टप्पा दोन मध्ये समाविष्ट करण्यासाठी गावासाठीचे निकष निर्धारित केल्यानंतर गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करून सह हजार ९५९ गावांच्या यादीला मान्यता देण्यात आली आहे.

तालुकानिहाय निवड झालेल्या गावांची संख्या

अर्धापूर - ९, उमरी - १४, कंधार - ३०, किनवट - ४२, देगलूर - २७, धर्माबाद - १५, नांदेड - १४, नायगाव - २६, बिलोली - २१, भोकर - १०, माहूर - ३२, मुदखेड - १२, लोहा - ३३, हदगाव - ३१, हिमायतनगर - १७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT