POCRA Project : ‘पोकरा’ प्रकल्पाचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती

POCRA Project Update : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्याला युती सरकारने मान्यता दिली असली, तरी प्रकल्प आराखड्याला मंत्रिमडळाची तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
POCRA
POCRAAgrowon
Published on
Updated on

Pune News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्याला युती सरकारने मान्यता दिली असली, तरी प्रकल्प आराखड्याला मंत्रिमडळाची तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पोकराच्या दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यासाठी जागतिक बॅंकेकडून पुन्हा कर्ज काढले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, जळगाव, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा २१ जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पात असेल. या प्रकल्पाला केंद्राने मान्यता दिली असून, कर्जाचा प्रस्ताव जागतिक बॅंकेला पाठविण्यात आला आहे.

POCRA
Pocra Scheme GR : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्पात ६ हजार ९५९ गावांचा समावेश

कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हवामान अनुकूल शेती पद्धतीला चालना देण्यासाठी पोकराच्या दुसऱ्या टप्प्याचा वापर केला जाईल. त्यासाठी प्रकल्पाचा अंमलबजावणी आराखडा तयार करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. परंतु जागतिक बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या करारनाम्याचा मसुदा अद्याप अंतिम झालेला नाही. या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेणे बंधनकारक आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी यापूर्वीच एक सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे.

POCRA
POCRA Scam : ‘पोकरा’ घोटाळ्यातील अधिकाऱ्याला कारवाईऐवजी बढतीचे बक्षीस

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीची बैठक अद्याप झालेली नाही. प्रकल्पाची मार्गदर्शक तत्त्वे, सामंजस्य करार अजून निश्‍चित झालेले नाहीत. जागतिक बॅंकेशी याबाबत निश्‍चित काय वाटाघाटी करायच्या हे ठरलेले नाही. ते ठरविण्याची जबाबदारी राज्याच्या कृषी सचिवांकडे देण्यात आलेली आहे. पोकरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शेती संशोधन, सिंचन, कर्ब उत्सर्जन, उत्पादकता वाढ, पौष्टिक तृणधान्ये, हवामान बदलास अनुकूल शेती, जमीन सुपीकता या मुद्दांवर भर असेल. त्यासंदर्भात प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याशिवाय प्रकल्पाची अंमलबजावणी करता येणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

सुकाणू समितीत कुलगुरूंना स्थान

पोकरा प्रकल्पाच्या सुकाणू समितीत परभणी, अकोला व राहुरी येथील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना स्थान देण्यात आले आहे. कृषी आयुक्तांसह नियोजन, अर्थ, सहकार, कृषी, पशुसंवर्धन व जलसंधारण विभागाच्या सचिवांनाही सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com