SMART Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Smart Cotton Project : स्मार्ट कॉटन प्रकल्पासाठी कटोलमधील १५ गावांची निवड

Cotton Project : बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट कॉटन प्रकल्पासाठी काटोल तालुक्‍यातील १७ गावांची निवड करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nagpur Smart Cotton Project News : बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट कॉटन प्रकल्पासाठी काटोल तालुक्‍यातील १७ गावांची निवड करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या नियंत्रणात स्मार्ट कॉटन प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. प्रकल्पातून शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी मूल्यवर्धनाचे धडे दिले जात आहेत.

कच्चा कापसाची विक्री करण्याऐवजी त्याचे जिनिंग, प्रेसिंग आणि त्यानंतर गाठी बांधण्यावर भर दिला जात आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या हंगामात देखील या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्याकरिता काटोल तालुक्‍यातील १५ गावांची निवड करण्यात आली. या गावातील कापूस उत्पादकांची मेंडकी (ता. काटोल) येथे सभा पार पडली. त्यात कापूस उत्पादनापासून प्रक्रिया व मूल्यवर्धन यावर मार्गदर्शन करण्यात आले.

एक गाव एक वाण, दर्जेदार कापसाचे उत्पादन, कापूस कचऱ्यामुळे होणारे नुकसान, वेचणीची तंत्रशुद्ध पध्दत, साठवणूक, कापसाच्या धाग्याची लांबी, जिनिंग, प्रेसिंग, रुई, गाठी तसेच सरकीच्या ऑनलाइन विक्री पद्धती, दरातील तफावत, रुईचा दर्जा टिकवण्यासाठीची काळजी याची माहिती देण्यात आली.

सभेला कृषी पर्यवेक्षक छत्रपती नागमोते, ग्रेडर इंद्रपाल बागडे, कृषी सहाय्यक ए. हेडाऊ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल भैस्वार, माजी सरपंच विजय भैस्वार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेषराव सोनेकर, संजय खानदे, प्रमोद भैस्वार यांची उपस्थिती होती.

ही आहेत गावे

प्रकल्पात गंगालडोह, बोरडोह, येनवा, राजनी, इसापूर, चिखली, मेंडकी यांसह इतर आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT