Nursery Agrowon
ॲग्रो विशेष

Aurangabad News : ‘हर घर नर्सरी’ उपक्रमासाठी अतिरिक्त गावांची निवड करा

गावातील किमान ४०० कुटुंबांनी प्रती कुटुंब ५० रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Team Agrowon

Aurangabad News : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन (Marathwada Muktisangram Din) अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हरघर नर्सरी (Har Ghar Nursery Campaign) उपक्रमासाठी अतिरिक्त गावाची निवड करून उपक्रम गतीने राबविण्याबाबतचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना (Vikas Meena) यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याचवेळी अधिनस्त सर्व विभाग प्रमुखांकडे प्रत्येकी दहा ग्रामपंचायती जबाबदारी निश्चित करून देण्याचीही श्री. मीना यांनी सूचित केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना यांच्या पत्रानुसार, दरवर्षी पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची मोहीम राबविले जाते. रोपांच्या उपलब्धते बाबत यंत्रणा म्हणून जिल्हा परिषदेस खूप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते.

यामुळे विहित वेळेत व लक्षांकानुसार वृक्ष लागवड होत नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातून काही मोठी गावे निवडून गावातील जास्तीत जास्त कुटुंबांनी हर घर नर्सरी हा उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

गावातील किमान ४०० कुटुंबांनी प्रती कुटुंब ५० रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शास्त्रीय पद्धतीने रोपवाटिका उभारणीचे उद्दिष्ट ठेवून रोपवाटिका उभारणी करणे, रोपांची लागवड, संगोपन व निगा यासाठी कृषी विभागाने पंचायत समिती स्तरावर ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील ९३ गावांची ग्रामपंचायतीची निवड आधीच केली आहे.

विभागीय आयुक्त यांच्या १ फेब्रुवारीच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेस जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या व कुटुंब संख्या लक्षात घेता प्रती कुटुंब ५० रोप प्रमाणे एकूण १ कोटी ९६ लाख १७ हजार ५०० रोप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे.

ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत या उपक्रमासाठी अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे.

या उपक्रमाची योग्य अंमलबजावणी व संनियंत्रण होण्याच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी अधिनस्त सर्व विभाग प्रमुख यांच्याकडे प्रत्येकी दहा ग्रामपंचायतीची जबाबदारी निश्चित करून द्यावी, असे श्री. मीना यांनी आपल्या आदेशातून स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: राज्य सरकारचे अतिवृष्टीच्या मदतीचे दर अखेर जाहीर; शासन निर्णय जारी, काय आहेत मदतीचे दर?

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान

Jowar Cultivation : अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या कोठारात हरभरा, करडई

Onion Market : निर्यात धोरणाचा, बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तालुकास्तरावर करा

SCROLL FOR NEXT