Mulberry Cultivation : तुती नर्सरी लागवड पूर्वप्रशिक्षण

नवीन तुती लागवड करण्यासाठी येत्या २०२३-२४ मधील जिल्हा रेशीम कार्यालय, औरंगाबाद येथे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे तुती नर्सरी लागवड पूर्व प्रशिक्षण नुकतेच पार पडले.
Mulberry Cultivation
Mulberry CultivationAgrowon

औरंगाबाद : नवीन तुती लागवड (Mulberry Cultivation) करण्यासाठी येत्या २०२३-२४ मधील जिल्हा रेशीम कार्यालय, औरंगाबाद येथे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे तुती नर्सरी लागवड (Mulberry Nursery) पूर्व प्रशिक्षण नुकतेच पार पडले.

जिल्ह्यात महारेशीम अभियानात औरंगाबाद जिल्ह्यासाठी ३०० एकर लक्षांक होता. प्रत्यक्षात जिल्ह्यात ६१८ एकर तुती लागवडीसाठी नोंदणी झाली आहे.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : मराठवाड्यात २००० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट

औरंगाबाद येथील रेशीम फार्म चिकलठाणा, जिल्हा क्रीडा संकुल जवळ, केंब्रीज सावंगी बायपास, औरंगाबाद येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले होते.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : तुतीची लागवड करून रेशीम शेती करावी

या प्रशिक्षणामध्ये रेशीम उपसंचालक दिलीप हाके, जालन्याचे रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

औरंगाबादचे रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे यांनी रेशीम फार्म चिकलठाणा, औरंगाबाद येथे नर्सरी लागवडीबाबतची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून नर्सरी लागवडीचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com