Seed Demand Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej Seed : रब्बी हंगामासाठी 'महाबीज'चा बियाणे पुरवठा सुरू

Rabi Season : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी हरभरा लागवड होऊ लागली आहे. या हंगामासाठी महाबीजने अधिकाधिक बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले आहे.

 गोपाल हागे

Akola News : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी हरभरा लागवड होऊ लागली आहे. या हंगामासाठी महाबीजने अधिकाधिक बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले आहे. ज्वारी बियाण्यांचा संपूर्ण पुरवठा झालेला आहे, तर हरभऱ्याचेही २५ टक्के बियाणे बाजारात पुरवल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन कलंत्रे यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

रब्बी हंगामात महाबीजचे बियाणे नियोजन व पुरवठ्याबाबत त्यांनी माहिती दिली. डॉ. कलंत्रे म्हणाले, ‘‘राज्यात रब्बीत हरभरा हे प्रमुख पीक उत्पादीत केले जाते. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामासाठी महाबीज हरभऱ्याचे नवे व जुने वाण मिळून सुमारे दोन लाख ते दोन लाख २० हजार क्विंटलपर्यंत बियाणे पुरवणार आहे.

या बियाण्याचा वेगाने पुरवठा सुरू झालेला आहे. रब्बी ज्वारीचे २९ हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध करून दिले आहे. करडईचेही अडीच हजार क्विंटल बियाणे महाबीज देत आहे. गव्हाच्या लागवडीला सध्या वेळ असला तरी हंगामासाठी यंदा ८० हजार क्विंटल बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’’

रब्बी ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे. ज्वारीला मिळत असलेला दर तसेच चाऱ्याची उपलब्धता होत असल्याने ज्वारी क्षेत्र वाढू शकते. यासाठी ३५ ते ४० हजार क्विंटल बियाणे पुरवठ्याचे महाबीजकडून नियोजन करण्यात आलेले आहे. यंदा भरडधान्य वर्ष असल्याने कृषी विभागामार्फत मिनीकिट वितरीत केल्या जात आहेत.

महाबीजने ज्वारीच्या (प्रतिकिट २ किलो ) तीन लाख ३० हजार मिनीकिट उपलब्ध करून दिल्या आहेत. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेशातील काही भाग तसेच विदर्भातही रब्बी ज्वारी लागवडीचा कल वाढतो आहे, असेही डॉ. कलंत्रे म्हणाले.

येत्या काही दिवसांत एक-दोन पाऊस झाले तरी लागवडीसाठी फायदेशीर ठरणार आहे. रब्बी पिकांच्या लागवडीला त्याचा फायदा होईल. प्रामुख्याने गहू लागवड अधिक होईल. नगर, नाशिक जिल्ह्यांसह मराठवाड्यात गव्हाचे क्षेत्र अधिक होऊ शकते.

खरिपातून बियाण्याची अपेक्षा

महाबीजने यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे ३५ हजार हेक्टरवर विविध जिल्ह्यात बीजोत्पादन प्लॉट दिलेले आहेत. या क्षेत्रात अधिकाधिक बियाणे यंदा मिळेल अशी अपेक्षा ठेवली जात आहे. मागील दोन-तीन हंगामात परतीच्या पावसामुळे बीजोत्पादनालाही फटका बसलेला आहे. त्यामुळे यंदा अपेक्षा वाढलेल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT