Ginger Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Cultivation : बियाणे दरामुळे आल्याचे लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता

Ginger Seed Rate : गतवर्षीच्या तुलनेत म्हणजे प्रतिगाडी ४८ ते ५० हजार रुपयांपर्यंत दर सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. हे बियाण्याचे दर सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.

विकास जाधव 

Satara News : या हंगामात बियाणे दरात विक्रम होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील दोन वर्षांपासून दरात तेजी आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत म्हणजे प्रतिगाडी ४८ ते ५० हजार रुपयांपर्यंत दर सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. हे बियाण्याचे दर सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.

याचा परिणाम क्षेत्रावर दिसून येणार आहे. पुढील दर चांगले राहतील, असे वाटत असल्याने कमी का होईना आले लागवड होणार आहे. सध्याचे बियाण्याचे दर व उपलब्ध पाणीस्थिती ही सर्व परिस्थिती बघता आले पिकाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आले लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे. सध्या आले बियाण्यास प्रतिगाडीस (५०० किलो) ४८ ते ५० हजार रुपयांपर्यंत दर निघाला आहे. हा दर गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. यामुळे आले पीक क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर, सातारा जिल्ह्यांत सर्वाधिक आले पिकाची लागवड होते. आगामी आले लागवडीच्या दृष्टीने निरोगी बियाणे शोध व खरेदी काम सुरू झाले आहे. बियाण्याच्या खरेदीच्या तोंडावर असतानाच धुणीच्या आल्याच्या दरात सुधारणा होत असल्याने बियाण्याचे दरातही सुधारणा होत आहे. आले बियाणे शेतकरी एकमेकांकडून खरेदी होत असल्याने यामध्ये व्यापाऱ्यांचा संबंध कमी असतो.

गतवर्षी आल्याच्या बियाण्याचे दर २५ हजार ते ३५ हजारांपर्यंत गेले होते. तसेच धुणीच्या आल्यास विक्रमी म्हणजे ७० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. यामुळे बियाण्यास दिलेल्या आल्यास दुपटीने धुणीच्या आल्यास दर मिळाल्याने या हंगामात आले बियाण्यास देण्यास शेतकरी इच्छुक दिसत नाही. याचा परिणामही बियाणे दरावर दिसत आहे. फेब्रुवारीपर्यंत आल्याचे दर प्रतिगाडी ३० ते ३५ हजारांपर्यंत होते. यामुळे बियाण्याचा जास्तीतजास्त ४० हजारांपर्यंत जातील असा बहुसंख्य शेतकऱ्यांचा अंदाज होता.

मात्र परिस्थतीत बदल झाला आहे. धुणीच्या आल्याचे दरात सुधारणा होत असल्याने बियाण्यास काढावा का नाही या संभ्रम अवस्थेत शेतकरी सापडले आहेत. बियाण्यासाठी आले निरोगी असणे फायदेशीर ठरते. मात्र गतवर्षी कमी पावसामुळे मुळकूज, कंदकूजीचा प्रादुर्भाव जास्त झाले निरोगी प्लॉटची संख्या कमी आहे. त्याच धुणीच्या आल्यास वाढणारे दर बियाण्याचा दरात वाढ होताना दिसत आहे.

सध्या आले बियाण्यास प्रतिगाडीस (५०० किलो) ४८ ते ५० हजार रुपयांपर्यंत दर निघाला आहे. गतवर्षी मार्च अखेरीस धुणीच्या आल्याचे दर कमी झाल्याने बियाण्याचा दर कमी झाला होता. या वेळी मात्र धुणीचा दरही वाढत असल्याने बियाण्याच्या दराही तेजी आली असून यामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT