Seed Mother Rahibai Popere Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Seed Production : राहीबाई पोपेरेंकडून शेतकऱ्यांसाठी देशी बियाणे निर्मितीची मोहीम

Indigenous Seed Conservation : गावरान आणि देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी गावरान बियाण्यांची निर्मिती व प्रचार प्रसार यांच्यासाठी मोहीम उघडली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : गावरान आणि देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी गावरान बियाण्यांची निर्मिती व प्रचार प्रसार यांच्यासाठी मोहीम उघडली आहे. खरीप हंगामात लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकांच्या बियांची सध्या काढणी आणि उन्हामध्ये वाळवणी या कामांना वेग आला आहे.

अकोले तालुक्यात आदिवासी भागात देशी बियांसाठी काम करणाऱ्या पद्मश्री रंगाचे वेगवेगळ्या देशी बियाण्यांचे जतन आणि संवर्धन करतात. अधिकाधिक शेतकऱ्यांनी देशी बियाण्यांची पेरणी लागवड करावी, यासाठी त्यांचा पुढाकार असतो. बीज माता अशी ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी या वर्षी देशी बियाणांच्या संवर्धनासाठी मोहीम उघडली आहे. शेतामध्ये वेळ देऊन शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे निर्माण करण्यामध्ये त्या सध्या व्यग्र आहेत.

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यग्र असतानाही त्यांनी दर्जेदार गावरान बियाणे निर्मितीवर भर दिला आहे. त्यांनी त्यासाठी जोरदार मोहीम आपल्या कुटुंबीयांसहित हाती घेतली आहे. वाल, घेवडा व वाटाणा यांच्या सुमारे २३ वाणांची लागवड यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी केली होती. अत्यंत दर्जेदार व सकस बियाणे सध्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. राज्य आणि परराज्यातील अनेक शेतकरी येथील बीज बँकेला भेट देऊन विविध बियाणे दरवर्षी खरेदी करत असतात.

अकोले तालुक्याचे नाव देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गावरान बियांच्या निर्मितीसाठी आता ओळखले जाऊ लागले आहे. वांगी, टोमॅटो, मिरची, काकडी, दुधी भोपळा, खरबूज, कारले, लाल भोपळा, घोसाळी, दोडका गवार, भेंडी, मुळा, शेपू अशा विविध पिकांचे अस्सल देशी वाण त्यांच्याकडे तयार करण्यात आले आहेत. देशातील शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध कार्यक्रमांतून देशी बियाण्यांचा प्रचार व प्रसार वर्षभर राहीबाई करत असतात.

नुकत्याच त्या तेलंगाणा राज्यात जाऊन आल्या. तेलंगणा बायोडायव्हर्सिटी बोर्ड आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवाला त्यांनी नुकतेच संबोधित केले. याशिवाय गोवा गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यांतूनही त्यांच्या बियाण्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.

वाढती मागणी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत अस्सल गावरान बियाणे पोहोचवण्यासाठी बीजमाता सरसावल्या आहेत. शाळा, कॉलेजे, शैक्षणिक संकुले, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून गावरान बियाणे चळवळीला गती देण्यासाठी काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री साह्यतामधून नाशिक विभागात ३५४२ रुग्णांना साडेबत्तीस कोटींची मदत  

Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित

Farmer Scam: कर्मचाऱ्याने लाभार्थ्यांचे २३ लाख लुबाडले

SMART Project: ‘स्मार्ट’अंतर्गत १६ ‘एफपीओं’ना १०.५३ कोटींचे अनुदान वितरित

Nanded Weather: नांदेडसाठी पुन्हा ‘येलो अलर्ट’ जारी

SCROLL FOR NEXT