Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : शंभू सीमेवर शेतकरी आंदोलन सुरूच; दुसरी बैठकही अनिर्णित

Farmers Protest At Shambhu Border : हरियाणा-पंजाबच्या पोलिस अधिकाऱ्यांनी शंभू सीमेवर आंदोलनावर बसलेल्या शेतकऱ्यांशी दुसऱ्यांदा चर्चा केली. मात्र याही बैठकीत निर्णय न झाल्याने चर्चेची दुसरी फेरी अपयशी ठरली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : शंभू सीमेवर ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मन परिवर्तन करण्यात हरियाणा पोलिसांच्या अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाना पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकरी नेत्यांशी रविवारी (ता.२५) चर्चा केली. पण शेतकरी दिल्ली चलो मोर्चावर ठाम असून पोलिसांच्या चर्चेतून त्यांचे समाधान झालेले नाही. यामुळे गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा आयोजित बैठकीत देखील कोणताच तोडगा निघालेला नाही. यावेळी एडीजीपी (इंटेलिजन्स) जसकरण सिंह आणि एआयजी संदीप गर्ग यांच्यासह पतियाळाचे डीसी आणि एसएसपी, हरियाणा अंबाला जिल्ह्याचे एसपी आणि एसडीएमसह शेतकऱ्यांच्या वतीने सर्वनसिंह पंढेर व अन्य नेते उपस्थित होते.

या बैठकीत पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महामार्गाच्या दोन्ही बाजूची एक लेन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. पण ट्रॅक्टर-ट्रॉली सोडता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले. यावरून शेतकरी नेत्यांनी शंभू सीमा उघण्याची आपली मागणी पहिल्या दिवसापासून आहे. मात्र आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून ट्रॅक्टर-ट्रॉली सोडू शकत नाही असे म्हटले आहे. तर शेतकऱ्यांनी दिल्ली चलो मोर्चावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी यावर अधिक बोलण्याची गरज व्यक्त करताना इतर काही मुद्द्यांवरही चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. यानंतर एका अधिकाऱ्याने शंभू सीमेवर तोडगा निघावा अशी शेतकऱ्यांचीही इच्छा असल्याचे बोलून दाखवले. तसेच शंभू सीमा उघडणे हा महत्त्वाचा विषय असून तो सोडविण्यासाठी यापुढेही बैठका घेतल्या जातील. रविवारी झालेली बैठक शांततेच्या वातावरणात पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबैठकीनंतर सर्वन सिंग पंढेर यांनी याआधी देखील केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या मध्ये बैठकांच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. आताही बैठका सुरू आहेत. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला तरच ते शक्य आहे. पंजाबमध्ये आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताच प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे पंजाब पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात तसेच सांगावे अशीही मागणी सर्वन सिंग पंढेर यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT