Heat Wave
Heat Wave Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Wave : तापमानाचा हंगामातील उच्चांक

Team Agrowon

Weather Update : पुणे : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्र उष्ण झळांनी भाजून निघत आहे. राज्यात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २५) उत्तर महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भात राज्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.    

‘अलडोरॅडो वेदर’ या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार पाकिस्तान, ओमान, सेनेगल आणि भारताचा भूभाग सध्या खुपच तापला आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पाकिस्तानातील जाकोबाबाद येथे तापमान जगातील उच्चांकी ४९ अंशांवर पोचले आहे. राजस्थानातील बारमेरचा दुसरा क्रमांक लागत असून, तेथे देशाचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८.८ अंश तापमान नोंदले गेले आहे. जोधपूर, चूरू आणि जैसलमेर या शहरांचाही जगातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये समावेश आहे.  

पाकिस्तान व अफगाणिस्तानमार्गे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारतात उष्मा वाढला आहे. उष्ण झळांनी अंगाची काहिली होत असून, उकाड्याने चांगलाच घामटा निघत आहे. शुक्रवारी (ता. २४) राज्यातील जळगाव व अकोला येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी पारा ४३ अंशांच्या पुढे आहे.
आज (ता. २५) राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यातच राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. २५) पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३९.९, धुळे ४३.५, जळगाव ४५.५, कोल्हापूर ३६.२, महाबळेश्वर ३१.१, नाशिक ४१.२, निफाड ४०.५, सांगली ३६.५, सातारा ३७.२, सोलापूर ३७.०, सांताक्रूझ ३४.९, डहाणू ३७.२, रत्नागिरी ३३.२, छत्रपती संभाजीनगर ४३.५, बीड ४३.४, नांदेड ४१.०, परभणी ४१.१, अकोला ४५.५, अमरावती ४३.२, भंडारा ४०.२, बुलडाणा ४२.०, ब्रह्मपुरी ४३.२, चंद्रपूर ४३.२, गडचिरोली ४२.६, गोंदिया ४०.४, नागपूर ४१.९, वर्धा ४३.२, वाशीम ४२.०, यवतमाळ ४३.५.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, चंद्रपूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.  

४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे : जळगाव ४५.५, अकोला ४५.५, धुळे ४३.५, छत्रपती संभाजीनगर ४३.५, यवतमाळ ४३.५, बीड ४३.४, अमरावती ४३.२, ब्रह्मपुरी ४३.२, चंद्रपूर ४३.२, वर्धा ४३.२.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Rate Protest : दूधदरासाठी शेतकरी राज्यभर आक्रमक

Nana Patole : महायुती सरकारचे धोरण दूध उत्पादकांसाठी मारक : दूध भुकटी आयातीवरून पटोले यांची टीका

Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; ७ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग

Census : जनगणना रखडणे ही धोक्याची घंटा

Raju Shetti : राजू शेट्टी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आजपासून राज्य दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT