Sugarcane Season
Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvest Season In Marathwada : मराठवाड्यातील ६३ पैकी ४१ कारखान्यांचा हंगाम आटोपला

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ६३ पैकी ४१ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम (Sugarcane Season) आटोपला आहे.

२७ मार्च अखेरपर्यंत गाळपात सहभागी कारखान्यांनी २ कोटी ३९ लाख ४४ हजार ४९६ टन ऊस गाळपातून २ कोटी २७ लाख ३४४ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील अनेक साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सध्या अंतिमतेकडे वाटचाल करताना दिसतो आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी झालेल्या ६३ कारखान्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी या दोन जिल्ह्यातील प्रत्येकी ७, हिंगोली व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी ५, बीडमधील ८, नांदेडमधील ६, लातूरमधील १२ व धाराशिवमधील १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

२७ मार्च अखेरपर्यंत गाळपात सहभागी या कारखान्यांनी केलेल्या साखर उत्पादनात जवळपास पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा पुढे राहिला आहे.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड व लातूर या जिल्ह्यांतील कारखान्यांचा समावेश आहे. धाराशिव व परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा अनुक्रमे ८.९७ व ९.७४ टक्के राहिला आहे.

तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे ७.४७ टक्के इतकाच राहिल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय हंगाम आटोपलेले कारखाने संख्या

छत्रपती संभाजीनगर - ४

जालना - १

बीड - २

परभणी- ६

हिंगोली - ५

नांदेड - ६

लातूर - ७

धाराशिव - १०

जिल्हानिहाय ऊस गाळप( टनामध्ये) व साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

जिल्हा - ऊस गाळप- साखर उत्पादन

छ. संभाजीनगर- २०४५९९८ - २१७७८६१

जालना - २३१७९०२ - २३९२४२०

बीड- ४१४०१७३ - ३०९१३०५

परभणी - २८८९२३१ - २८७१६८०

हिंगोली - १५५६५५० - १६४२०२५

नांदेड - १७७४४४१- १७७७६२०

लातूर - ४२८५३७५ - ४३२०४८६

धाराशिव - ४९३४८२६ - ४४२६९४७

हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ऊस गाळप पूर्ण

मराठवाड्यातील निम्म्यापेक्षा जास्त कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. त्यापैकी हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला असून धाराशिवमधील १३ पैकी १०, लातूरमधील १२ पैकी ७, छत्रपती संभाजीनगरमधील ७ पैकी ४, बीडमधील ८ पैकी २, जालन्यातील ५ पैकी १ कारखान्याचा ऊस गाळप हंगाम २७ मार्च पूर्वी आटोपला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT