Rohit Pawar On Ajit Pawar: विधानसभेत (Maharashtra Budget Session 2026) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. २३ फेब्रुवारी) अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल मांडलेल्या शोक प्रस्तावावर बोलताना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार भावूक झाले. अजितदादांना आणखी काही काळ, अजून काही वर्षे मिळाली असती तर, महाराष्ट्रातील प्रमुख स्थान म्हणजे ते मुख्यमंत्री झाले असते, अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली. .अजितदादांनी केली होती टोमॅटोची शेती, विक्रमी भावही मिळालाअजितदादांना शेतीची कशी आवड होती? याची एक आठवण त्यांनी सांगितली. ''शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान कसे आणता येईल? यासाठी अजितदादा नेहमी त्यासाठी प्रयत्न करत असत. त्या काळात त्यांनी टोमॅटोची शेती केली होती आणि त्यावेळी उत्पादन चांगले घेऊन ८० हजार एवढा विक्रमी भाव त्यांना मिळाला होता. त्याबद्दल आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि पवारसाहेबांनी त्यांचे अभिनंदन केले होते. शेतकऱ्यांबद्दल अजितदादांना नेहमी आदर असायचा. काय झाले तरी हार मानायची नाही, ही शेतकऱ्यांची क्वॉलिटी अजितदादांमध्ये होती.'' असे रोहित पवार यांनी सांगितले. .पायाखालची जमीन सरकणे काय असते? हे आम्ही २८ जानेवारीला अनुभवले. अजितदादांचे समाज आणि राजकारणातील कार्य ४० वर्षांपेक्षा जास्त आहे. माझे वय ४० आहे. माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव अजितकांकाचा राजकारणातील होता, असे ते म्हणाले. .Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक.१९८२ मध्ये छत्रपती शिवाजी सहकारी कारखान्याचे संचालक म्हणून ते निवडून आले. त्यावेळी त्यांचे वय २३ वर्षे होते. त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, शिक्षण संस्था, दूध संस्था, विरोधी पक्षेनेते अशी विविध पदे त्यांनी भूषविली. ते तेव्हापासून २०२६ पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राहिले. विधानसभेत आल्यानंतर दादा कुठे बसलेत? आमच्याकडे लक्ष ठेवून असतील, असे आजही आम्हाला वाटते..Ajit Pawar Plane Crash Probe: 'हा घातपात असू शकतो?'; अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांना शंका.पवार साहेबांवर चुकून कोणी काय बोलले तर सभागृहाला डोक्यावर घेतलेले आपण त्यांना बघितलेले आहे. या सभागृहात पहिल्यांदा येणारा नेता आणि सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर शेवट जाणारा नेता कोण असेल तर ते अजितदादा असायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी लोकांच्या हितासाठी काम केले, अशी त्यांची कामाची पद्धत त्यांनी सांगितली. .माझ्या वडिलांचे आणि त्यांचे खूप चांगले संबंध होते. दोघांनाही शेती आवडायची. एकदा त्यांना चांगली जर्सी गाय घ्यायची होती. दोघांनी ठरवलं चला आपण बंगळूरला जाऊ. गायींची निवड केली. बंगळूरपासून बारामतीपर्यंत शेण स्वच्छ करणे, दूध काढणे ह्या सगळ्या गोष्टी अजितदादा आणि माझ्या वडिलांनी केल्या. शेतामध्ये जात असताना गाजर गवत असेल तर उपटायचे आणि ते बांधावर काढून ठेवायचे. लहानपणी कोल्हापुरात राजश्री शाहू महाराजांच्या शाळेमध्ये गेल्यानंतर पुरोगामी विचाराचा त्यांचा मनावर, ध्यानावर आणि विचारावर बसला. .ते १८ ते २० वर्षाचे असतील; तेव्हा त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. शेतीची पूर्ण जबाबदारी काकांवर आली. शेतीत नवीन प्रयोग कसे करायचे? हे ते समजून घेत होते. अजितदादांच्या वडिलांच्या निधनानंतर म्हणजेच अनंतराव आजोबा वारल्यानंतर दादांची पवार साहेबांनी फार मनापासून काळजी घेतली. स्वतःच्या पोटच्या पोरासारखं त्यांना वाढवले आणि दादांनीदेखील पवारसाहेबांचा आदर शेवटपर्यंत ठेवला. जसजसे अजितदादा स्वतःला सिद्ध करत गेले तशी अधिकची जबाबदारी पवार साहेबांनी अजितदादांवर दिली, असे रोहित पवारांनी सांगितले. .'मुश्रीफसाहेब, माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच!'मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अश्रूंना वाट मोकळी करून देत आपल्या भावना व्यक्त केल्या. मी सलग सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रत्येक शपथविधीला स्वर्गीय कै. अजितदादा पवार मला म्हणायचे, "मुश्रीफसाहेब, माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच...!" असे सांगताना मुश्रीफ भावूक झाले. अजित दादांकडे घेऊन गेलेले योग्य काम असेल ते होणारच. त्यांचा अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर प्रचंड वचक होता. जर काम योग्य असेल तर गट, पार्टी, जात, धर्म काही बघत नव्हते. ते काम ताबडतोब कसे पूर्ण होईल यासाठी सातत्याने ते प्रयत्न करायचे, असे ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.