Sugar Mill
Sugar MillAgrowon

Sugar Mill Pending FRP : ‘एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा

ऊस बिले थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
Published on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामातील (Sugarcane Crushing Season) (२०२२-२३) संपूर्ण ऊस गाळप संपून जवळपास एक ते दीड महिना झाला, तरीही अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची ‘एफआरपी’ची बिले थकवली आहेत.

ही बिले थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंबंधीचे निवेदन तहसील कार्यालयाला दिले. पंढरपूर तालुक्यातील ऊस जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्याला जातो.

मंगळवेढा, माळशिरस, माढा, मोहोळ तालुक्यांतील साखर कारखान्यांना शेतकरी ऊस पाठवतात. सर्वच साखर कारखान्यांनी कमी-अधिक प्रमाणात ऊस बिले थकवली आहेत. त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.

Sugar Mill
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा

‘मार्च एंड’ असल्यामुळे बँका, सोसायट्या, फायनान्स, पतसंस्था, खत-औषध दुकानदार इत्यादी सर्व आर्थिक पतपेढ्या शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत पैसे भरण्यासाठी तगादा लावत आहेत, अनेक शेतकऱ्यांची वाहने फायनान्स ओढून नेत आहेत.

बँकेची अधिकारी शेतकऱ्यांच्या दरात हेलपाटे घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ ऊसबिले मिळणे आवश्यक आहे. वेळेत पैसै मिळाले नाहीत, तर तुटून गेलेल्या उसाची मशागत खत-पाणी औषध फवारणीचे व्यवस्थापन वेळेत होणार नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील वर्षीच्या ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे ऊसबिले थकविलेल्या सर्व साखर कारखान्यांनी तातडीने थकलेली बिले शेतकऱ्यांना द्यावीत, अन्यथा प्रशासनाने थेट या कारखान्यावर आरआरसीची करवाई करावी.

सध्या आम्ही निवेदन देऊन सांगत आहोत, पण त्यानंतर आम्ही थेट तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यासंबंधीच्या निवेदनात देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com