Majhi Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ अर्ज छाननी सत्ताधाऱ्यांकडेच

Ladki Bahin Yojana : विधासभा क्षेत्रनिहाय समिती देणार मंजुरी; अध्यक्ष, सदस्य नियुक्तीचे अधिकार पालकमंत्र्यांना

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Majhi Ladki Bahin Yojana Application : मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या अशासकीय सदस्यांच्या तालुका आणि वॉर्डस्ततरीय समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अधिकार देण्यात आले आहेत. तालुका आणि वॉर्डस्तरीय समिती प्राप्त अर्जांनी छाननी करून ती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. त्यानंतर ती यादी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे पाठविण्यात मंजुरीसाठी देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकही श्रेय घेण्यास सरसावले आहेत. कोणताही विरोध न करता आता महिलांचे अर्ज संकलन करून नोंदणी करत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसण्याची चिन्हे लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. अर्ज कुणीही जमा केले तरी निवडीचे अधिकार सत्ताधाऱ्यांनी नेमेलेल्या समितीलाच असतील.
या समितीतील दोन अशासकीय सदस्य आणि अध्यक्ष निवडीचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आला आहे. शासकीय सदस्य नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अशासकीय सदस्य या समितीचा अध्यक्ष असेल. त्यामुळे सत्ताधारी पक्षांना आपल्या सोयीच्या सदस्याला अध्यक्षपद देणे शक्य झाले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता रक्षाबंधन दिवशी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेच्या नोंदणीला वेग आला आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांच्या यादीची छाननी तालुका आणि वॉर्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समिती नेमण्यात येणार होती. मात्र त्याऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती स्थापन करण्यात येणार आहे. तालुका आणि वार्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत असेल. तसेच जिल्हाथिकाऱ्यांनी या समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करावा.

या समितीने जिल्ह्यातील प्राप्त अर्जांची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्यात. ज्या महिला अपात्र ठरतील त्यांच्या त्रुटींच्या पूर्ततेसाठी अर्ज पुन्हा देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका आणि वार्डनिहाय प्राप्त झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या पात्रता याद्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीने मंजूर केलेल्या महिलांची यादी ऑनलाइन प्रणालीवर करावी लागणार आहे.
Remarks :

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT