Midday Meal Agrowon
ॲग्रो विशेष

School Nutrition Scheme : पोषण आहारातील खर्चासाठी १.३३ रुपयाची वाढ

Midday Meal : राज्य सरकारने शालेय पोषण आहार योजनेत प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी लाभार्थी खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक मे २०२५ पासून सुधारित दर लागू केला आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्य सरकारने शालेय पोषण आहार योजनेत प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी लाभार्थी खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक मे २०२५ पासून सुधारित दर लागू केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चार हजार ७६ शाळांमधील चार लाख ७८ हजार १३४ हून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना धान्यासाठी पूर्वी ५.४५ रुपये प्रतिविद्यार्थी मिळायचे. आता ६.७८ रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनयुक्त, तर सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनयुक्त आहार दिला जातो.

या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवला जातो. यापूर्वी या योजनेसाठी प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी अनुक्रमे ५.४५ रुपये व ८ रुपये दिले जात होते. वाढत्या महागाईमुळे पदरमोड करावी लागत असल्याच्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या तक्रारी होत्या.

तेल, मीठ व इतर साहित्यासाठी खिशातून द्यावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. केंद्र सरकारने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी या योजनेच्या खर्चात वाढ करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.

त्यानुसार पोषण आहार योजनेच्या प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी खर्चात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या योजनेअंतर्गत नागरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा केला जातो. त्यांनाही या सुधारित दरानुसार खर्च दिला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Cooperatives: कोनिनॲग्रो : कृषी अर्थव्यवस्थेची व्यावसायिक शक्ती

Animal Diseases: जनावरांतील प्रकाशसंवेदनशीलतेची लक्षणे आणि उपाय

LPG Price Hike: महागाईची झळ; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ

Biogas Plant: विडणी गावात अडीचशेहून अधिक बायोगॅस प्रकल्प

Biodiversity Conservation: जैवविविधता संवर्धनासाठी ग्रामपंचायतींची भूमिका

SCROLL FOR NEXT