PM Surya Ghar Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Surya Ghar Yojana : पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा

Solar Energy : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकासाठी असून या योजनेकरिता राष्ट्रीय बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकासाठी असून या योजनेकरिता राष्ट्रीय बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

या वेळी कोल्हापूर परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’, पंतप्रधान मोफत सूर्यघर योजना व इतर प्रमुख कामांचा आढावा घेण्यासाठी नीता केळकर यांनी कोल्हापूर येथे बैठक घेतली.

तत्पूर्वी ग्राहक संघटना व उद्योजकांच्या समस्याही जाणून घेतल्या व त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. याप्रसंगी नीता केळकर यांनी धोरणात्मक प्रश्नांचा मुख्यालय व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही ग्राहक प्रतिनिधींना दिले.

केळकर म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर प्रकल्पांना वेग दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १७० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरू आहे.

मागेल त्या शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदानातून सौरपंप दिले जात आहेत. तर घरगुती ग्राहकांसाठी पंतप्रधान मोफत सूर्यघर योजनेसाठी ३० हजारांपासून ७८ हजारांपर्यंत अनुदान मिळते. अद्ययावत नवीन स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये गैरसमज असून काळानुसार नवीन तंत्रज्ञान ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Demand: प्रति हेक्टरी ७० हजारांची भरपाई द्यावी

Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार

Rabi Intercropping: रब्बीत कोरडवाहू क्षेत्रात आंतरपिकाचे पर्याय कोणते? अधिक उत्पादनासाठी आंतरपीक गरजेचे

Irrigation Project: ‘मसलगा’च्या दुरुस्तीला वेग द्या; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Farmer Protest: शेतकरीपुत्रांचा भूम येथे रास्ता रोको

SCROLL FOR NEXT