Surya Ghar Yojana : अडीच हजार घरांवर सौर पॅनेलचे काम पूर्ण

Solar Energy : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ८ हजार २२८ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ८ हजार १७९ अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
Solar Project
PM-Surya GharAgrowon
Published on
Updated on

Solapur News : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ८ हजार २२८ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ८ हजार १७९ अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर त्यापैकी ५ हजार ८११ घरांवर सध्या सौर पॅनेल बसवण्याचे काम सुरू असून, त्यातील अडीच हजार घरांवर पॅनेलचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

भारतात सौर ऊर्जा वापरण्याची गरज वाढत आहे आणि याच पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान सूर्यघर योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा प्रणालींचा प्रसार करणे आणि नागरिकांना या पर्यावरणीय उपक्रमात सहभागी करणे आहे. स्वतःचे घर असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला यात सहभाग घेता येतो.

Solar Project
PM Surya Ghar : 'पीएम सूर्य घर' योजनेत महावितरणचे अनेक अडथळे; मीटर चाचणीत दिरंगाई

घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. यामुळे सौर पॅनेल प्रभावीपणे कार्य करू शकतात आणि ऊर्जा उत्पादनात वाढ होईल. या योजनेसाठी अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे जमा करणे अनिवार्य आहे.

अर्जदाराकडे वैध वीज जोड असावा, कारण योजनेचा फायदा घेण्यासाठी वीज जोडची गरज असते. तसेच अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही इतर सोलर पॅनल सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रणालीच्या क्षमतेवर आधारित सबसिडीची मदत दिली जाते.

Solar Project
PM Surya Ghar Yojana : अमरावतीत २७ कोटींचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात

तीन श्रेणींमध्ये सौर पॅनेल

या योजनेत सहभागासाठटी तीन प्रमुख श्रेणी आहेत. त्यात शून्य ते १५० युनिटनिर्मिती, सौर ऊर्जा प्रणाली क्षमता १ ते २ किलोवॅट आणि सबसिडी ३०,००० ते ६०,००० रुपये, १५०-३०० युनिटनिर्मिती- सौर ऊर्जा प्रणाली क्षमता २ ते ३ किलोवॅट आणि सबसिडी ६०,००० ते रु. ७८,००० रुपये आणि ३०० पेक्षा जास्त युनिटनिर्मिती, सौर ऊर्जा प्रणाली क्षमता ३ किलोवॅटपेक्षा जास्त आणि सबसिडी ७८,००० रुपये मिळते.

सूर्यघर योजना महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, जो नागरिकांना सौरऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहित करतो. योग्य पात्रता आणि सबसिडीच्या माध्यमातून ही योजना आपल्या घरात सौर ऊर्जा प्रणालीची स्थापना करण्यास मदत करते. त्यामुळे या कार्यक्रमात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्‍यक आहे.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com