Vegetable Market Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Abhiyan : सावता माळी बाजार अभियान ‘पणन’कडे

Savatamali Rayat Bazar : ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान पुन्हा एकदा पणन विभागाकडे देण्यात आले आहे

Team Agrowon

Mumbai News : ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान पुन्हा एकदा पणन विभागाकडे देण्यात आले आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र, या अभियाना अंतर्गत निश्चित करण्यात आलेली अनेक उद्दिष्टे कृषी विभागाशी संबंधित आहेत. त्यामुळे पणन विभाग यात नेमके काय करणार याची स्पष्टता शासन आदेशात नाही.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संकल्पनेतून २०१६ मध्ये संतशिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत आठवडी बाजार भरविण्यात येत होते.

मात्र, या योजनेत कालांतराने मरगळ आली. कोविड काळात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी घरपोच फळे, भाजीपाला आणि अन्य शेतीमाल देण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर ही योजना कृषी विभागाकडे शासन आदेशाद्वारे वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार ‘विकेल ते पिकेल’ ही व्यापक संकल्पना घेऊन हे अभियान नव्याने विकसित केले होते.

शेतीमाल उत्पादक आणि ग्राहकाला काय हवे, याचा शोध घेऊन त्यानुसार पीक पद्धती, कृषी प्रक्रिया, पुरवठा साखळी, विक्री व्यवस्था विकसित करणे आदींबाबत मदत करण्यासाठी या अभियानाचा उपयोग करणे हा मुख्य उद्देश होता.

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थांद्वारे काढणीपश्चात हाताळणी, मूल्यवृद्धी आणि प्राथमिक प्रक्रिया केलेला माल संघटित खरेदीदार, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांना पुरवठा करण्याची व्यवस्था उभी करण्यावर भर देण्यात येणार होता. आता हे अभियान पणन विभाग सुरू ठेवणार असून कृषी विभागाने निश्चित केलेली कार्यपद्धती तशीच राहणार आहे.

...असे आहे ‘विकेल ते पिकेल’ अभियान

बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीवर भर देणे

पिकांचे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे

शेतीव्यवसाय हा उद्योगक्षम करणे

शेतीमाल विक्रीसाठी ब्रँड विकसित करणे

शेतीमाल मूल्यसाखळी विकास प्रकल्पाद्वारे बाजाराच्या वाढीव संधी उपलब्ध करणे

कृषी व्यवसाय सुलभतेसाठी धोरणात्मक बदल करणे

कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविणे

शेती उत्पादनात शाश्वतता आणणे व निव्वळ उत्पन्नात वाढ करणे

बाजारपेठीय माहितीचे विश्लेषण करणे व उत्पादकांना त्याची माहिती देणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT