Water Issue Strike
Water Issue Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue : पाणीप्रश्‍नावर मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा बैठा सत्याग्रह

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar Nagar News : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता. २२) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला.

या वेळी मागण्यांचे निवेदन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आले. त्यानुसार, गोदावरी खोऱ्यात नगर नाशिकला ११५ टीएमसी व मराठवाड्याची ८१ टीएमसी पाण्याचे सूत्र ठरलेले असताना नगर व नाशिकने ११५ ऐवजी १६५ टीएमसीची धरणे बांधली.

२००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा, १९ जानेवारी २०१४ च्या मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार पाणीवाटपाची जबाबदारी कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांची आहे.

दरवर्षी १५ ऑक्टोबरला मराठवाड्यात म्हणजे खालच्या धरणात किती पाणीसाठा आहे हे तपासून कार्यकारी संचालकांनी किती पाणी सोडता येईल याचे आदेश काढणे आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी करणे ही आवश्यक असल्याचे समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र सांगते.

२००५ ला पाणीवाटपाचे सूत्र ठरत असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी २००५ चा नियम तयार होत असताना उपलब्ध पाण्यापैकी १५७.२० टीएमसी पैकी नगर नाशिकला ९२ टीमसी मराठवाड्याला ६५.२० टीएमसी पाणी ठरवायला पाहिजे होते. यामुळे नगर - नाशिकला ७३ टीएमसी पाणी जास्त घेतल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र ठरत असताना मराठवाड्याला ६५ टीएमसी व नगर, नाशिकला ९२ टीएमसी पाण्याच सूत्र न ठरवल्यामुळे ७३ टीएमसी जास्त पाणी देणाऱ्या अधिकाऱ्यांची विशेष पदकामार्फत चौकशी करण्याची मागणी श्री. गायकवाड यांनी केली आहे. याशिवाय मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर ५० टीएमसीवर नगर, नाशिकने धरणे बांधली त्यांना प्रस्ताव देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

जायकवाडीच्या पाण्याची फेरनियोजनाचा शासन निर्णय करताना मराठवाड्यात जाणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्याचे पाणी कमी केले याची चौकशी करा. डाव्या व उजव्या कालव्याची १४ टीएमसी पाणी कमी केल्यामुळे जालना, बीड, परभणी येथील ५० ते ६० हजार एकर कालव्याने भिजणाऱ्या जमिनीचे नुकसान झाले याची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

विविध पक्ष, संघटनांचे परभणीत निदर्शने

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जायकवाडी धरणात ८.६ टीएमसी पाणी तत्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजन क्षीरसागर यांच्यासह विविध पक्ष, संघटनाचे पदाधिकारी तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मंगळवारी (ता. २१) सायंकाळी परभणी येथे निदर्शने करण्यात आली. या वेळी खासदार संजय जाधव, कॉम्रेड राजन क्षीरसागर, बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, ओंकार पवार, अगंद सोगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : तेजीनंतर आता तुरीचा बाजार दबावात

Raw Mango : लोणच्याच्या कैऱ्यांची आर्णी बाजारात आवक

Onion Market : नगर जिल्ह्यात कांदादर ३१०० ते ३२०० रुपयांवर स्थिर

HTBT Cotton : सविनय कायदेभंग करीत ‘एचटीबीटी’ची लागवड

Ginger Market : आले पिकाच्या दरात सात ते आठ हजारांनी घट

SCROLL FOR NEXT