Godavari Water Issue : पाणी सोडा अन्यथा गोदावरी महामंडळावर तीव्र निदर्शने

Narhari Shivpure : मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी त्वरित जायकवाडीत सोडा-अन्यथा मराठवाडा पाणी परिषदेतर्फे शुक्रवारी (ता. १७) गोदावरी महामंडळावर तीव्र निदर्शने करण्यात येतील,
Godavari River
Godavari RiverAgrowon
Published on
Updated on

Sambhajinagar News : मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी त्वरित जायकवाडीत सोडा-अन्यथा मराठवाडा पाणी परिषदेतर्फे शुक्रवारी (ता. १७) गोदावरी महामंडळावर तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा मराठवाड्यातील जनतेच्या वतीने मराठवाडा पाणी परिषदेतर्फे परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी दिला.

Godavari River
Fruit Farming : जिद्दीच्या जोरावर माळरानाचा कायापालट

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ आदेश दिनांक २३-९-२०१४ व माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचा आदेश दिनांक २३-९-२०१६ (पीआयएल १७३ २०१३) कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांचे आदेश ३०-१०-२०२३ हे मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या बाजूने असताना व उच्च न्यायालय मुंबई व सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांची स्थगिती नसताना जलसंपदा प्रशासन व सरकार पाणी का सोडत नाही, हे मराठवाड्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे.

Godavari River
Jalna OBC Sabha : ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ कडाडले ; मनोज जरांगेवर हल्ला

मराठवाड्यात यावर्षी दुष्काळ आहे. शेतकऱ्यांचे खरीपाचे सोयाबीन व कापूस पीक हातचे गेले आहे. रब्बी पिकाला तीन ते चार पाणी पाळ्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची ही भीषण टंचाई होणार आहे. अशा परिस्थितीत प्रशासन व सरकार उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडीत पाणी न सोडता आणखी शेतकरी आत्महत्येची वाट पाहत आहे का?

सरकार नगर व नाशिक विभागातील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडत आहे का असा सवाल शिवपुरे यांनी उपस्थित केला. मराठवाडा पाणी परिषदेतर्फे सनदशीर मार्गाने विविध आंदोलन करून झाले. परंतु बहुतेक सरकारला ही भाषा समजत नसावी. म्हणून मराठवाडा पाणी परिषदेतर्फे शुक्रवारी (ता. १७) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर कार्यालयावर दुपारी १२ वाजता तीव्र निदर्शने व रास्ता रोको करण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com