Police Bharti 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Police Bharti 2024 : पोलिस भरतीसाठी शनिवारी लेखी परीक्षा

Police Recruitment Exam : बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या १२५ पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा शनिवारी (ता.१३) सकाळी १० ते ११.३० या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिरात घेतली जाणार आहे.

Team Agrowon

Buldhana News : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या १२५ पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा शनिवारी (ता.१३) सकाळी १० ते ११.३० या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिरात घेतली जाणार आहे.

पोलिस दलातील १२५ पोलिस शिपाई पदांच्या भरतीसाठी एकूण ८ हजार ५३१ अर्ज प्राप्त झाले. यातील ५ हजार ९६० उमेदवार प्रत्यक्ष शारीरिक व मैदानी चाचणीस हजर राहिले. या मैदानी चाचणीत किमान ५० टक्के गुण घेऊन ३ हजार ३४२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहे. यातून प्रवर्गनिहाय १:१० याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी १ हजार ३६६ उमेदवार पात्र ठरले आहेत.

उमेदवारांची निवड यादी buldhanapolice.gov.in जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षातील नोटीस बोर्ड आणि पोलिस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षेसाठी

उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी ३ तास अगोदर म्हणजेच सकाळी ७ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी आवेदन अर्ज, प्रवेश पत्र व स्वतःच्या ओळखीसाठी लगतचा फोटो असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान कार्ड सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले.

लेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, इलेट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये.

लेखी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यान्वित राहणार असून उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभन, आमिषाला बळी पडू नये. कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत माहिती प्रत्यक्ष अवगत करून द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: कापूस खरेदी उद्यापासून बंद

Pune APMC: पुणे बाजार समितीत अतिक्रमणांवर थातुरमातूर कारवाई

Innovative Farming: दुर्गम वेल्हा तालुक्यात नावीन्यपूर्ण शेतीचे प्रयोग

Oil Trade: ‘होर्मूझ’मधून भारताला तेल वाहतुकीस परवानगी

Fertilizer Import: खते उपलब्ध, मात्र टंचाईचे सावट

SCROLL FOR NEXT