Gharkul Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Gharkul Yojana : ‘पंतप्रधान घरकुल’ मंजुरीत सातारा जिल्हा राज्यात प्रथम

Government Scheme : पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यात चार हजार ६०० घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले.

Team Agrowon

Satara News : पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यात चार हजार ६०० घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. यामध्ये आतापर्यंत तीन हजार १७३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले असून, २१० अपात्र लाभार्थींना आवास प्रणालीतून वगळण्यात आले आहे.

मंजुरी दिलेल्या लाभार्थीमधील आधार लिंक बँक खाते असलेल्या दोन हजार ४२२ लाभार्थींना घरकुलासाठी प्रथम हप्ता १५ हजार रुपयांप्रमाणे वितरणाचे काम पूर्ण झाले असून, राज्यस्तरावर घरकुल मंजुरी व हप्ता वितरणाच्या कामात जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.

जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेचे तत्कालीन प्रकल्प संचालक संतोष हराळे यांनी विविध घरकुल योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली. श्री. हराळे यांच्या बदलीनंतर प्रभारी प्रकल्प संचालक अर्चना वाघमळे यांनीही या विभागाचा कारभार गतिमान केला. पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरणाचे काम हाती घेतले.

तालुकास्तरावरील गटविकास विकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, लिपिक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डेटा ऑपरेटर यांच्या माध्यमातून मंजुरीचे काम गतिमान सुरू आहे. मंजुरी दिलेल्या सर्व लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये तालुकास्तरावर कार्यशाळा घेऊन घरकुल बांधकामाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्याने राज्यात अग्रेसर असे काम केल्याचा निश्चितच अभिमान आहे. या कामात प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केले आहे.
- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement: सोयाबीनसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ३० तारखेपासून नोंदणी सुरु होणार, कमी भावात सोयाबीन न विकण्याचे आवाहन

Agrowon Podcast: कांदा भाव कमीच, कापसाचा भाव दबावातच, गाजराला उठाव, उडदाचे भाव कमीच तर लसणाचे भाव टिकून

Employment Demand: पैसा नको, नोकरी द्या, वारसांना रेल्वेत सामावून घ्या’

Indian Prawn Export: ऑस्ट्रेलियानं भारतीय 'कोळंबी'वरील आयातबंदी उठवली; 'सी फूड' क्षेत्राला मोठा दिलासा

Paus Andaj : चार दिवस वादळी पावसाचा अंदाज; मराठवाडा, विदर्भातील बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT