Gharkul Yojana : दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवावी

Bachchu Kadu : राज्य शासनाने मागील वर्षी तीन डिसेंबर रोजी दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. या विभागाच्या वतीने राज्यातील दिव्यांगाना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Bacchu Kadu
Bacchu KaduAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्य शासनाने मागील वर्षी तीन डिसेंबर रोजी दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. या विभागाच्या वतीने राज्यातील दिव्यांगाना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

याच अनुषंगाने दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राज्य शासनाने राबवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, ती लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी (ता. २०) केले.

येथील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात आमदार कडू यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, दिव्यांग कल्याण आयुक्त विष्णुदास घोडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी बारगुंळे यांच्यासह दत्ता चौगुले, नितीन माने, आभूताई भोजने, झहीर शेख आदी उपस्थित होते.

Bacchu Kadu
Gharkul Yojana : अपूर्ण घरकुले पूर्णत्वासाठी गावस्तरावर मेळावे घेण्याचे आवाहन

आमदार कडू म्हणाले, की दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना झाल्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून दिला जात आहे.

या अभियानात दिव्यांग नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेऊन त्यावर प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश दिले जात आहेत. या माध्यमातून हजारो दिव्यांगांना शासनाच्या योजनेचे प्रत्यक्ष लाभ मिळत आहेत. एकही पात्र दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोलापूर व पंढरपुरातील कोणताही दिव्यांग बांधव उपाशी राहत असेल, तर त्याची माहिती द्यावी त्या बांधवाला घरपोच दोन वेळ जेवण लोकमंगलच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केले, तर आभार सच्चिदानंद बांगर यांनी मानले.

Bacchu Kadu
Gharkul Scheme : पंतप्रधान घरकुल योजनेत नातेपुतेचा समावेश

व्यवसाय उभारणीसाठी मदत करणार

जिल्ह्यातील अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शक्ती केंद्र निर्माण करावीत, शंभर टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करावीत. दिव्यांगाचे बचत गट स्थापन करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा. दिव्यांगानेही शासनाच्या पाच टक्के निधीवर अवलंबून न राहता, शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी शासन मदत करेल, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.

दिव्यांगांचा सन्मान

आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते या वेळी अंध क्रिकेटपटू गंगा कदम हीस ५० हजारांचा धनादेश महापालिकेच्या वतीने देण्यात आला. अस्थिव्यंग क्रिकेटपटू मनोज धोत्रे, कळसूबाई शिखर सर केलेले दिव्यांग सोमनाथ घुले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अस्थिव्यंग अबूताई भगत, वेल्डर दस्तगीर शेख, चित्रकार लक्ष्मी शिंदे, गायक शिवशरण गडतुटे, समाजसेवक प्रभाकर कदम यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com