Nampur Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Nampur Market Committee : सटाणा, नामपूर बाजार समित्यांवर प्रशासक

Team Agrowon

Nashik News : कसमादे भागात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सटाणा व नामपूर बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ २० जून रोजी पूर्ण झाला. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी दोन्ही ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती केली.

सटाणा येथे बागलाणचे सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांची तर नामपूर येथे मालेगाव येथील प्रथम श्रेणीचे सहकार अधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात पत्र जारी केले आहे.

सटाणा, नामपूर या दोन्ही ठिकाणी २१ जून २०१८ रोजी सुरू झालेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ सद्यःस्थितीत २० जून २०२३ रोजी संपुष्टात आला. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांनी सटाणा बाजार समितीच्या प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारला.

सटाणा बाजार समिती कार्यालयात सभापती नरेंद्र आहिरे, उपसभापती केशव मांडवडे यांच्या हस्ते शेळके यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सचिव भास्कर तांबे, उपसचिव विजय पवार, लेखापाल भगवान अलई, चंद्रकांत आहिरे आदींसह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांत सटाणा बाजार समिती सभापतिपदी मंगला सोनवणे, संजय सोनवणे, सुनीता देवरे, संजय देवरे, पंकज ठाकरे व नरेंद्र आहिरे तसेच उपसभापतिपदी सरदारसिंग जाधव, प्रभाकर रौदळ, प्रकाश देवरे, मधुकर देवरे, केशव मांडवडे आदींची वर्णी लागली होती.

नामपूर बाजार समितीमध्ये विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार राजकीय फिल्डिंग लावण्यात आली होती. परंतु सहकार विभागाने एका दिवसाची मुदतवाढ न देता मालेगाव येथील प्रथम श्रेणीचे सहकार अधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली.

प्रशासक राजवटीच्या निर्णयाबद्दल शेतकरी संघटनेचे नेते, कांदा उत्पादक शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी कांदा लिलावात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT