Satara News: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवारी सकाळी तरडगाववरून निघाल्यानंतर काळज या ठिकाणी न्याहरी आवरून एक वाजता निंभोरे गावामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आगमन झाले. तालुका प्रशासन व निंभोरे ग्रामपंचायतीच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळ्यास पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शन रांगेमध्ये शिस्तबद्धता आणण्यासाठी स्वतः अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर उपस्थित होत्या. या वेळी पालखी विसावा स्थळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी भेट दिली.
या वेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, निंभोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा लांडगे, उपसरपंच नवनाथ कांबळे, सदस्य मुकुंद ननवरे, नितीन मदने, सनी मदने, मोहिनी चिंचकर, वनिता अडसूळ, सुरेखा कांबळे उपस्थित होते. संध्याकाळी सहा वाजता फलटणमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर श्रीराम देवस्थानच्या वतीने माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवरांच्या पालखी सोहळ्याचे हस्ते स्वागत करण्यात आले.
फलटण येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम असून आज (ता. २९) बरडकडे प्रस्थान करणार आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी तरडगाव येथे रोटरी महर्षी (कै.) अप्पासाहेब चाफळकर प्रवेशद्वारावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ग्रामस्थांनी रथातून घेऊन खांद्यावर घेतली आणि त्या वेळी ग्रामस्थांकडून झालेल्या जयघोषात पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी विसावला. पालखीपुढे मानाच्या २७ दिंड्या व पालखी मागील २० एवढ्या दिंड्या पालखीसोबत गावातून येतात. विठ्ठल मंदिर येथे माउलींची पहिली पाद्यपूजा करण्यात आली. दुसरी पाद्यपूजा पवारवाडा येथे पवार बंधू मानकऱ्यांच्या हस्ते झाली.
श्रीराम मंदिरापुढे चाफळकर वाडा येथे अरविंद चाफळकर व प्रकाश चाफळकर यांच्याकडून तिसरी पाद्यपूजा करण्यात आली. बापू बुवा मठामध्ये भादोलीकर मंडळींकडून पूजा करण्यात आली. पुढे पालखी गावाबाहेरून माउली चौकातून पालखी तळावर नेण्यात आली. समाज आरती होऊन सोहळा तरडगाव मुक्कामी विसावला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.