Food Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Food Processing Scheme : देशात सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना अंमलबजावणीत सांगली तृतीय

PMFME Scheme : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत एक हजारहून अधिक प्रकल्प मंजूर असून ही योजना राबविण्यामध्ये सांगली जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Team Agrowon

Sangli News : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत एक हजारहून अधिक प्रकल्प मंजूर असून ही योजना राबविण्यामध्ये सांगली जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२५-२६ हे योजनेचे अंतिम वर्ष असून, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आणखी एक हजार प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

श्री. काकडे म्हणाले, की केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे ही योजना २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षांसाठी लागू केली आहे. अंतिम वर्षात या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात एक हजार प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे जवळपास २० कोटींचा निधी अनुदानापोटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकूण पाच हजार कुशल व अकुशल मनुष्यबळाची रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, की या योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये २०२०-२१ पासून आजअखेर जिल्‍ह्यात १३२० प्रकल्प मंजूर असून लाभार्थींना ३८.१८ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेद्वारे सुमारे ५९५५ कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाला आहे. ही योजना राबवण्यामध्ये सांगली जिल्‍हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात उभारलेल्या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने बेदाणा प्रक्रिया - ३१७, तृणधान्य प्रक्रिया - १७७, कडधान्य प्रक्रिया - १५४, मसाला उद्योग - २३३, दुग्ध प्रक्रिया उद्योग - ७७, फळ व भाजीपाला प्रक्रिया - ४५, बेकरी पदार्थ - १३३, गूळ प्रक्रिया - २०, खाद्यतेल प्रक्रिया - ४८, पशुखाद्य निर्मिती - ४१ व इतर - ७५ आदी उद्योगांचा समावेश आहे.

योजना अनुदान

सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान देण्यात येते. गट उद्योगांना (सामाईक पायाभूत सुविधा) प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदान देण्यात येते.

मार्केटिंग व ब्रॅन्डिंग घटकाकरिता शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट यांचे समूह यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान. वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहायता गट लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रशिक्षण देण्यात येते.

काय आहे योजना

शेतकऱ्यांच्या शेतात तयार होणारा शेतीमाल, दूध व इतर कृषी निगडित निर्माण होणाऱ्या उत्पादनांच्या मूल्यवर्धनास (अन्नप्रक्रिया) चालना देण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली.

सध्या कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविणे, नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी प्रोत्साहन देणे व असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित स्वरूप देणे ही योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे. आजारी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज उपलब्ध होत असल्यास पात्र पारंपरिक, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन व प्रकल्पांच्या औपचारिकीकरणाला भर देण्यात येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT