Food Processing Industry : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत कोल्हापूर राज्यात दुसरे

PMFME Scheme : केंद्र पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये २०२४-२५ मध्ये जिल्ह्यामध्ये ४१५ लक्ष्यांकापैकी ४३२ (१०४ टक्के) प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली आहे.
Food Processing
Food Processing Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्र पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये २०२४-२५ मध्ये जिल्ह्यामध्ये ४१५ लक्ष्यांकापैकी ४३२ (१०४ टक्के) प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली आहे.

सध्या ही योजना राबविण्यात जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे. सर्व शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले.श्री. पांगरे यांनी केले.

Food Processing
Food Processing Success Story: १० हजारांपासून १० लाखांपर्यंत! विजयमाला देशमुख यांचा उद्योग प्रवासाचा यशोगाथा

केंद्र शासन सहाय्यित पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षांच्या कालावधीत राबविली जात आहे. योजनेचा हेतू शेतीमालावर प्रक्रिया करणारे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तसेच गट, शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था/स्वयं सहायता गट यांची पतमर्यादा वाढविणे, सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणणे व त्यांचा विस्तार करणे, उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन बळकट करून संघटित पुरवठा मूल्य साखळीशी जोडणे, नवीन सूक्ष्म उद्योग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे व असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे हा आहे. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाचे प्रमाण ६०:४० असे आहे.

Food Processing
Women Food Processing Business: महिलांना अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४३२ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी २६.५१ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. २०२०-२१ पासून ९९० प्रकल्प मंजूर असून लाभार्थींना ४१.८० कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने काजू प्रक्रिया, फळे व भाजी प्रक्रिया, बेकरी, दूध उत्पादने, मिरची प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, पशुखाद्य निर्मिती प्रक्रिया आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेद्वारे ३ हजार ८०० कुशल, अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाला आहे.

उत्पादननिहाय ४३२ प्रकल्प कार्यान्वित

तृणधान्य उत्पादने ९०, गूळ उत्पादने १८, पशुखाद्य उत्पादने १०, सोयाबीन प्रक्रिया उत्पादने २, दुग्धजन्य पदार्थ उत्पादने २९, फळे व भाजीपाला प्रक्रिया उत्पादने १०, मसाले उत्पादने ३८, बेकरी प्रक्रिया उत्पादने ४८, तेलबिया उत्पादने ५, काजू उत्पादने १६७, अन्य उत्पादने ४ असे एकूण ४३२ उत्पादननिहाय प्रकल्प कार्यान्वित आहेत. या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com