Agristack Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agristack Registration : सांगली जिल्ह्यात ‘ॲग्रीस्टॅक’ वर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

Agristack Scheme : केंद्र सरकारने ‘ॲग्रीस्टॅक’ शेतकरी ओळख क्रमांक मिळविण्याबाबतची नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुमारे जिल्ह्यातील शेतकरी संख्या ९ लाख २२ हजार ८९३ आहे. ॲग्रीस्टॅक योजनेचे काम सुरू झाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Team Agrowon

सांगली ः केंद्र सरकारने ‘ॲग्रीस्टॅक’ शेतकरी ओळख क्रमांक मिळविण्याबाबतची नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुमारे जिल्ह्यातील शेतकरी संख्या ९ लाख २२ हजार ८९३ आहे. ॲग्रीस्टॅक योजनेचे काम सुरू झाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी केंद्र शासन ॲग्रीस्टॅक योजना राबवत आहे. या योजनेत नोंदणीनंतर शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळणार आहे. नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे.

जिल्ह्यात ९ लाख २२ हजार ८९३ शेतकरी आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी ६५० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा व तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवर महसूल, कृषी आणि ग्रामविकासच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. मोबाइल ॲपद्वारे पिकांची नोंदही करण्यात येणार आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ जलद मिळणार आहे.

शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
 आधार कार्ड
 ७/१२ उतारा
 आधारला लिंक असलेला मोबाइल नंबर
  काही ई-सेवा केंद्रचालक शेतकरी नोंदणी घरबसल्याही करून देत आहेत.
या योजनांसाठी फायदा
 पीएम किसान
 पीककर्ज
 पिकांच्या नुकसन भरपाईसाठी सर्वेक्षण व भरपाईची रक्कम अदा करणे
 कृषी सेवांची माहिती पोहोचवणे
 किसान कार्ड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

Mushroom Processing: अळिंबीचे २४ नवे प्रकल्प

Soil Health: मराठवाड्यातील जमिनीमध्ये नत्र, स्फुरद अन्नद्रव्यांची कमतरता

Maize MSP: हमीभावाने मका खरेदी सुरू

Weather Update: चार दिवस थंडी कमी राहणार

SCROLL FOR NEXT