Farmer ID : ‘ॲग्रीस्टॅक’ बनविण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी

Agristack Scheme : राज्यात एकाचवेळी सर्व सेतू कार्यालयांत, सायबर कॅफे तसेच सीएससी केंद्रात फार्मर युनिक आयडी ॲग्रीस्टॅक बनवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने संबंधित संकेतस्थळाला सर्व्हर डाउनचा फटका बसत आहे.
Farmer with Digital ID
Farmer with Digital ID Agrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यात एकाचवेळी सर्व सेतू कार्यालयांत, सायबर कॅफे तसेच सीएससी केंद्रात फार्मर युनिक आयडी ॲग्रीस्टॅक बनवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने संबंधित संकेतस्थळाला सर्व्हर डाउनचा फटका बसत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी बनविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क केला असता शेतकऱ्यांनी सकाळी लवकर सर्व्हर सुरू असताना लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘ॲग्रीस्टॅक’ बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे; अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.

सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांना, ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला ७/१२ आधारला लिंक करावयाचा आहे. यामुळे एक फार्मर आयडी मिळेल. ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ याद्वारे घेता येईल. फार्मर आयडी बनविला नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही.

Farmer with Digital ID
Farmer ID: ‘अॅग्रीस्टॅक’मुळे एक लाख शेतकऱ्यांना मिळाला ‘आयडी’

त्यासाठी जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला ७/१२ ला आधारलिंक करून घ्यावे व फार्मर आयडी बनवून घेण्याचेही सांगितले. सिन्नर तालुक्यामध्ये एकूण १,७१,९५५ शेतकरी यांची नोंदणी करणे अपेक्षित असून त्यापैकी शनिवार (ता.१) पर्यंत केवळ ८६४१ शेतकऱ्यांनीच त्यांची नोंदणी केली आहे.

Farmer with Digital ID
Farmer ID : सरकारी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक

नोंदणीस इगतपुरी तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद व परिणामकारकपणे पोचविण्यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करत ॲग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर) योजना शासन राज्यात राबवत आहे. मात्र या योजनेला इगतपुरी तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

यामुळे तहसीलदार कार्यालयाने गावोगावी फार्मर आयडी कॅम्प राबवत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन केले आहे.तालुक्यातील मौजे साकूर फाटा येथे तहसील कार्यालयाने अंतर्गत शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी नोंदणी सुरू आहे.

तसेच तालुक्यातील वाडीवऱ्हे, घोटी, धारगाव, पिंपरीसदो, सांजेगाव, टाकेद, खेड, कावनई अशा विविध ठिकाणी कॅम्प सुरु केले असून याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार बारावकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com