Grape Export Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Export : सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची १० हजार टन निर्यात ; निर्यातीस वेग; गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज

Grape Production : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस गती आली आहे. आजअखेर युरोपियन आणि आखाती देशात १० हजार ७३८ टन निर्यात झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali Grape : सांगली ः जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस गती आली आहे. आजअखेर युरोपियन आणि आखाती देशात १० हजार ७३८ टन निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून यंदा द्राक्ष नोंदणी ५४५ ने वाढली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातून १० हजार १७१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा डिसेंबरअखेर झालेल्या पावसामुळे निर्यात कामकाज रखडले होते. पुन्हा द्राक्षखुडे सुरू होऊन टप्प्याटप्प्याने निर्यात सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काळात निर्यातीची गती फारशी नव्हती. त्यामुळे निर्यातीचा वेग कमी होता. गेल्या पंधरा दिवसांपासून निर्यातीची गती वाढली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. मार्च महिन्यापासून निर्यातीचा अजून वेग वाढणार आहे.

जिल्ह्यातील शेतकरी युरोपियन देश आणि आखाती देशात द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. सांगली जिल्ह्यातील ८ हजार ५६३ शेतकऱ्यांनी निर्यात परवाने नूतनीकरण केले, तर १ हजार ६०८ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी अशी एकूण १० हजार १७१ शेतकरी निर्यातीसाठी पुढे आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी द्राक्ष निर्यात करण्यासाठी पुढे येऊ लागला आहे. द्राक्ष निर्यात सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. या तीन महिन्यात जिल्ह्यातून १० हजार ७३८ द्राक्षाची निर्यात केली आहे.

गतवर्षीच्या हंगामात ९६३७ शेतकऱ्यांनी १९ हजार २०७ टन द्राक्षाची निर्यात झाली होती. तर सन २०२३ मध्ये १७ हजार ९९४ टन द्राक्ष युरोपियन देशासह आखाती देशात पोहोचली. गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष निर्यात वाढू लागली आहे. द्राक्ष निर्यातीचा हंगाम अजून सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत निर्यातीत वाढ होईल, अशी आशा आहे.


वाहतुकीस अडथळा तरीही निर्यातीस गती
इस्राईल आणि हमास युद्ध थांबले. परंतु सुएझ कालव्यामार्गे वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे केप ऑफ गुड-होप-दक्षिण मार्गे वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीतही निर्यातीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे युरोपियन देशात राज्यातून द्राक्ष निर्यात गतीने सुरू आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी वाढली आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही यंदा निर्यात वाढेल असा अंदाज आहे.
- प्रकाश नागरगोजे,
कृषी अधिकारी (निर्यात) सांगली
 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात घसरण, हरभरा दरात चढ-उतार, पालक दर स्थिर, फ्लॉवर दर टिकून तर पपईच्या आवकेत घट

Kharif Sowing: परभणी, हिंगोलीत तूर, मूग, उडीदाची ७० हजार हेक्टर पेरणी

Vidarbha Orange Farming : संत्रा ठरेल विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा आधार

Flood Control Project: कोल्हापूर- सांगलीचा पूरप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत शेतकऱ्यांच्या नावासमोर अर्धवट रक्कम; कोणते कर्ज माफ केले? आमदार कैलास पाटील यांचा सवाल

SCROLL FOR NEXT