Rabi Season MSP 2027-28: केंद्र सरकारने रब्बी हंगााम २०२७-२८ साठी सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास बुधवारी (ता. ३०) मंजुरी दिली. करडईच्या हमीभावात सर्वाधिक ६७५ रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. तर गव्हाच्या हमीभावात २५ रुपये आणि हरभऱ्याच्या हमीभावात ८३ रुपयांची वाढ केली आहे. मुख्यतः गहू, बार्ली, हरभरा, मसूर, करडई, मोहरी आणि रेपसीड (मोहरीवर्गीय तेलबिया) या पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान ५० टक्के अधिक परतावा देण्याच्या उद्देशाने हे हमीभाव निश्चित केल्याचे केंद्राने सांगितले..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) हा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालास किफायतशीर हमीभाव मिळण्याची खात्री मिळेल आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे..Rabi Season Planning: रब्बीसाठी डेटाधारित पद्धतीचा अवलंब करा: कृषिमंत्री चौहान.करडईच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक प्रति क्विंटल ६७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे करडईची एमएसपी प्रति क्विंटल ७२१५ रुपयांवर पोहोचली आहे. मोहरी आणि रेपसीडमध्ये प्रति क्विंटल ४१३ रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता त्याची किंमत प्रति क्विंटल ६६१३ रुपये निश्चित झाली आहे. तर मसूरच्या दरात ३९० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे मसूरला आता प्रति क्विंटल ७३९० रुपये भाव मिळेल..हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत ८३ रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल ५९५८ रुपये, बार्लीची किंमत १३६ रुपयांनी वाढवून २२८६ रुपये केली आहे. तर गव्हाच्या किमतीत केवळ २५ रुपयांची वाढ करून प्रति क्विंटल २६१० रुपये केली आहे. सुधारित किमतीनुसार, गव्हाची किमान आधारभूत किंमत गेल्या हंगामातील प्रति क्विंटल २५८५ रुपयांवरून वाढून २६१० रुपये होईल. तसेच, बार्लीचा हमीभाव २२८६ रुपये, हरभरा ५९५८ रुपये, मसूरचा ७३९० रुपये, रेपसीड आणि मोहरीचा हमीभाव ६६१३ रुपये निश्चित झाला आहे..Rabi Crops MSP 2027-28: केंद्राकडून रब्बी पिकांच्या हमीभावात वाढीचा निर्णय, करडईत सर्वाधिक, गहू, हरभऱ्यात सर्वात कमी वाढ .विशेष म्हणजे यातून गव्हाच्या किमान आधारभूत किमतीतील वाढ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येते. २०२६-२७ मधील रब्बी हंगामात सरकारने गव्हाची एमएसपी १६० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल २५८५ रुपये निश्चित केली होती. याच हंगामात करडईचा हमीभाव ६०० रुपयांनी वाढवला होता. तर मसूर ३०० रुपये तसेच रेपसीड व मोहरीचा हमीभाव क्विंटलमागे २५० रुपयांनी वाढवला होता..हमीभाव खरेदीतून शेतकऱ्यांना ९०९६२ कोटी मिळतील : वैष्णवउदाहरणार्थ, गहू पिकाचा उत्पादन खर्च १२६४ रुपये असून, त्याचा हभीमाव प्रति क्विंटल २६१० रुपये निश्चित केला आहे. ही वाढ १०० टक्क्यांहून अधिक म्हणजेच उत्पादन खर्चाच्या दुपटीहून अधिक आहे. त्याचबरोबर, बार्लीसाठीही हमीभाव हा अंदाजित उत्पादन खर्चाच्या तुलनेत ५८ टक्क्यांनी अधिक निश्चित करण्यात आला आहे. बार्लीचा उत्पादन खर्च १४४७ रुपये खर्च असून, त्याचा हमीभाव प्रति क्विंटल २२८६ रुपयांवर नेण्यात आला आहे. एकूणच, या रब्बी हंगामात ३२४ लाख टन धान्यांच्या हमीभाव खरेदीतून शेतकऱ्यांना ९०९६२ कोटी रुपये मिळतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.