Sangli DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli DCC Bank : थकबाकी वसुलीसाठी सांगली जिल्हा बॅंकेची मोहीम

Debt Recovery : मार्च अखेरीस अवघे दोन महिने राहिल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम सुरू केली आहे.

Team Agrowon

Sangli News : मार्च अखेरीस अवघे दोन महिने राहिल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम सुरू केली आहे. एक फेब्रुवारीपासून पुढील दोन महिने बँकेच्या जिल्ह्यांतील सर्व शाखा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. बँकेचा एनपीए कमी होत असून बँक राज्यात नंबर एककडे वाटचाल करीत आहे.

जिल्हा बँकेतील थकित कर्जामुळे अडचणीत येऊन प्रशासक नेमण्याची कार्यवाही झालेल्या बँकेची मागील दहा वर्षांत प्रगती झाली आहे. बड्या थकबाकीदार संस्थांकडील वसुलीसाठी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे बँकेचा एनपीए कमी होत आहे. त्यामुळेच बँकेवरील प्रशासक जाऊन पुन्हा संचालक मंडळ आले.

गेल्या आठ वर्षांपासून तसेच विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक, संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी थकबाकी वसुलीसाठी घेतलेल्या निर्णयामुळे कोट्यवधींची थकबाकी वसूल झाली आहे. बँकेच्या इतिहासात विक्रमी नफा झाला आहे.

सध्या बँक आर्थिकदृष्ट्या भक्कम झाली आहे. जिल्हा बँकांत राज्यात सध्या पहिल्या पाच क्रमांकात सांगली जिल्हा बँकेचा नंबर लागतो. बँकेला राज्यात नंबर एकवर नेण्यासाठी अध्यक्ष नाईक, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी थकबाकी वसुलीसाठी कृती आराखडा तयार केला आहे.

जत तालुक्यात वसुलीवर भर

जिल्हा बँकेची जत तालुक्यातील थकबाकीचे प्रमाण अधिक आहे. खातेदारांची संख्या अधिक आणि क्षेत्रही जादा असल्याने तसेच दुष्काळी पस्थितीचा वारंवार सामना करावा लागतो. त्यामुळे तालुक्यात थकबाकीचे प्रमाण अधिक आहे. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT