Bank Agrowon
ॲग्रो विशेष

DCCB Bank Sangali : सांगली जिल्हा बँक अपहारातील ४० लाखांची रक्कम वसूल

Sangali District Bank : संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरूच राहणार

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ५६.३३ लाखांच्या रकमेवर बॅँकेच्या कर्मचाऱ्यानेच डल्ला मारला आहे. शाखेचे कर्मचारी योगेश वजरीनकर, प्रमोद कुंभार, शाखाधिकारी एम. व्ही. हिले यांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचारी वजरीनकर यांनी ४० लाख रुपयांचा बॅंकेत भरणा केल्याची माहिती जिल्हा बँकेने दिली आहे.

दरम्यान, रक्कम वसूल झाली तरी त्यांच्यावरील कारवाई प्रक्रिया सुरूच ठेवली जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखांच्या तपासणीसाठी जाणाऱ्या सहा पथकांतील ४८ जणांना मुख्यालयात प्रशिक्षण देण्यात आले.
बॅँकेच्या तासगावमधील मार्केट यार्ड शाखेतील दुष्काळी निधीवर तेथील कर्मचारी योगेश वजरीनकरने अपहार केला. त्यांचा सहकारी निमणी (ता. तासगाव) शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी निमणी शाखेतील अवकाळी मदतीत अपहार तसेच तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम. व्ही. हिले यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तिघांना सोमवारी (ता. २०) निलंबित केले होते.

जिल्हा बॅंक प्रशासनाने केवळ दोनच दिवसांत ४० लाख रुपये वसूल केल्याची माहिती देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व शाखांच्‍या तपासणीचा निर्णय घेतला आहे. जिल्हाभरात सहा पथके स्थापन केली आहेत. पथकात ४८ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. संबंधित पथकाकडून येत्या पाच-सहा दिवसांत तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने एकाच ठिकाणी पाच वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण निश्‍चित केले आहे.


दुष्काळी निधीतील अपहारप्रकरणी तिघांवर निलंबनाची कारवाई केलीच आहे. सखोल चौकशी करून अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर फौजदारीही दाखल केली जाईल.
- शिवाजीराव वाघ, सीईओ, जिल्हा बॅंक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: राज्यात आणखी २ दिवस मुसळधारेचा अंदाज; कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता

Cage Fish Farming : शेततळ्यात पिंजरा पद्धतीने शाश्वत मत्स्यशेती करणे शक्य

Ujani Dam Pollution : उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन

Nandurbar Rain : तळोद्यात दमदार पावसाने पिकांना दिलासा

Agricultural Packaging: पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वाढेल वापर

SCROLL FOR NEXT