Sand  Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Mining : मुळा नदीतील वाळू उपसा निविदेला अखेर स्थगिती

Sand Update : मुळा नदीतील बारा गावांच्या शिवारातील वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने काढलेल्या निविदेला विरोध करत सरपंच व गावकऱ्यांनी तीव्र अंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर प्रशासन अखेर नरमले.

Team Agrowon

Nagar Sand News : मुळा नदीतील बारा गावांच्या शिवारातील वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने काढलेल्या निविदेला विरोध करत सरपंच व गावकऱ्यांनी तीव्र अंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर प्रशासन अखेर नरमले.

वाळू उपसा करण्यासाठीच्या निविदेला स्थगिती दिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील मुळा नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचा सरकारी डेपो सुरू करण्यासाठी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने अंमळनेर व निंभारी येथे वाळू डेपोची निर्मिती, साठा करणे, व्यवस्थापन व विक्रीबाबत वर्तमानपत्रात निविदा प्रसिद्ध केल्या.

मुळात नेवासा तालुक्यातील अंमळनेर, निंभारी, वांजळपोयी, शिरेगाव, खेडले परमानंद, करजगाव, खुपटी, पाचेगाव, इमामपूर, वाटापूर, आदी गावांत तीव्र विरोध सुरू झाला. एोव

वाळूचा उपसा होऊ नये यासाठी या भागातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेत वाळू उपशाला विरोध करून ठराव शासनाला पाठवले. शासनाच्या निविदा प्रक्रियेला सातत्याने विरोध करत निवेदनही दिली. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने निविदा प्रक्रिया काढली. यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन केले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संपर्क केला. विखे यांनी वाळूची निविदा प्रक्रिया व उत्खनन करण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

निविदा स्थगित झाल्याचे समजताच जल्लोष साजरा करण्यात आला. सरपंच दत्तात्रेय वरुडे, सरपंच श्रीकांत पवार, सरपंच राजेंद्र राजळे, सरपंच निरंजन तुवर, तिळापूर, मांजरी, सरपंच उपस्थित होते.

आम्ही अनेक वर्षांपासून वाळू उपसा होऊ दिला नाही. त्यामुळे आमच्या भागतील शेती समृद्ध आहे. कोणत्याही परिस्थिती या भागात वाळू उपसा होऊ देणार नाही. निविदेला स्थगिती दिल्याबद्दल गावकरी समाधानी आहेत.
ज्ञानेश्वर आयनर, सरपंच, अंमळनेर, ता. नेवासा, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT