Nitish Kumar  Agrowon
ॲग्रो विशेष

Nitish Kumar New Cabinet DCM : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही दोन उपमुख्यमंत्री; कोणाला लागली लॉटरी?

Nitish Kumar's Bihar News : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमधील नव्या नीतीश कुमार सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा रंगली होती. ही देखील चर्चा खरी ठरली आहे. तसेच हे दोन उपमुख्यमंत्री कोण आणि ही लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला असून नीतीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी याबाबत कारणही स्पष्ट करताना, मी काम करत होतो. पण मला आरजेडी आणि काँग्रेस काम करू देत नव्हती. सरकारच्या सर्व कामाचं श्रेय आरजेडी घेत होती. त्यामुळेच आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप होईल असे राजकीय तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जात होती. ती शक्यता रविवार (२८ रोजी) सत्यात आली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आरजेडी आणि काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. तसेच त्यांनी इंडिया आघाडीला देखील धक्का देत भाजपशी घरोबा केला आहे. ते आता ९ व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

दोन उपमुख्यमंत्री कोण?

दरम्यान महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमधील नव्या नीतीश कुमार सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा रंगली होती. ही देखील चर्चा खरी ठरली आहे. तसेच हे दोन उपमुख्यमंत्री कोण आणि ही लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान नीतीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागणार आहे.

७ वाजता होणार शपथविधी

बिहारमधील राजकीय वातावरण ढवळून काढणारा निर्णय नीतीश कुमार यांनी घेत राजीनामा दिला आहे. तर ते नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी आजच संध्याकाळी ७ वाजता होणार असून या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

2 उपमुख्यमंत्री आणि 6 कॅबिनेट मंत्री

नीतीश कुमार यांच्यासह 2 उपमुख्यमंत्री आणि 6 कॅबिनेट मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपकडून सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा आणि डॉ. प्रेम कुमार, जेडीयूकडून विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि श्रवण कुमार, एचएएम (एचएएम) कडून जितन राम मांझी यांचा मुलगा संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित सिंह हे मंत्रीपदाची शपथ घेणार घेतील.

विधीमंडळ नेते आणि उपनेते निवड

बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होण्याच्या आधी बिहारचे भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी यांच्याकडे विधीमंडळ नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विजय सिंह यांच्याकडे उपनेतेपद असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Decision: मंत्रीमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

Warna Dam Discharge : वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग

Agrowon Podcast: मोसंबीची आवक मर्यादीत; सोयाबीनचा बाजार स्थिरावला, तुरीचा बाजारभाव दबावातच, आल्याचे दर स्थिर तर वांग्याला उठाव

Tomato Diseases: टोमॅटोवरील मर आणि करपा रोगाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT