Bihar Political Crisis : बिहारमध्ये राजकीय भूकंप; नीतीश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Nitish Kumar Resigns : नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एकदा नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालिंना वेग आला आहे. नीतीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. तर ते आजच नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
Bihar Political Crisis
Bihar Political CrisisAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशाच्या राजकारणात सध्या महत्वाच्या घडामोडी घडत असून बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. येथे राजकीय तापमान वाढले असून नीतीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची राजीनामा रविवारी (२८ रोजी) दिला. त्यांनी हा राजीनामा सकाळी ११ वाजता राज्यपाल यांच्या भवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच त्यांनी यावेळी बिहारमध्ये आजच नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी यावेळी त्यांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

दरम्यान आपल्या राजीनाम्याच्याआधी नीतीश कुमार यांनी आपल्या पक्षाच्या खासदारंची बैठक घेतली होती. त्यानंतरच त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. दरम्यान ते आज संध्याकाळीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. यावेळी त्यांच्यासोबत २ उपमुख्यमंत्री ही शपथ घेणार आहेत. तर सुत्रांचे मते दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचे असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Bihar Political Crisis
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणतात राज्यातील शेतकऱ्यांना ४४ हजार कोटी रुपयांची मदत

शपथविधी ७ वाजता होणार

त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार होणाऱ्या या शपथविधीला गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित राहू शकतात. तर नीतिश कुमार यांचा शपथविधी हा आज सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होत असतानाच नीतीश कुमार एनडीएसोबत सरकार स्थापन करू शकतात. ते ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचवेळी, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कोणतीही घाई करू नये असे सांगितले आहे.

का झाले इंडियाआघाडीतून वेगळे?

दरम्यान मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत १७ महिन्यापासून सत्तेत असलेले महाआघाडी सरकार संपुष्टात आणले. तर राजीनामा दिल्यानंतर नीतीश कुमार यांनी राजीनामा देण्या मागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, 'काम होऊ दिले जात नव्हते, म्हणून राजीनामा दिला' तर पक्षाच्या लोकांची मते ऐकून घेतली. आता आम्ही राजीनामा दिला आहे.

आज महाआघाडीपासून वेगळे झालो. आम्ही युतीत जेवढे काम करत होतो, तेवढेच बाकीचे बोलत होते. आमचे बोलणे बंद झाले. आमच्या पक्षाच्या अभिप्रायानंतर आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आता नव्या युतीत जात आहोत. तिथेही लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

राजीनामे देऊ नका

दरम्यान बिहारमध्ये राजकीय नाट्य रंगले असतानाच आरजेडीच्या बैठकीदरम्यान तेजस्वी यादव यांनी खोचक टीका केली आहे. त्यांनी, खरा खेळ अजून खेळायचा आहे असे म्हणतात, नीतीश हे आमचे आदरणीय आहेत आणि ते राहतील असे म्हटलं आहे. तसेच जे काम दोन दशकात होऊ शकले नाही, ते काम आम्ही अल्पावधीत केले. तसेच लालूप्रसाद यादव यांनी आपल्या मंत्र्यांना राजीनामे देऊ नका अशी सुचना केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com