Nitish Kumar : नीतीश कुमार घेणार ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; २८ वर्षात भाजपसोबत तिसऱ्यांदा घरोबा

Nitish Kumar Resigns: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे बिहारमधील महाविकासआघाडीचे सरकार कोसळले. तर त्यांनी ८ व्यांदा मुख्यमंत्रिपदाचे पद सोडले असून ते ९ व्यांदा पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Nitish Kumar
Nitish Kumar Agrowon
Published on
Updated on

Pune News : बिहारमधील राजकीय उलथापालथीच्या चर्चांना आता पुर्णविराम लागला आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी रविवारी (२८ रोजी) सकाळी आपल्या पदाचा राजीमाना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे १७ महिने सत्तेत असणारे महाविकासआघाडीचे सरकार कोसळले आहे. दरम्यान त्यांनी महाआघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेताना पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा ९ वा शपथविधी आज सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या शपथविधीला भाजपने नेते उपस्थित राहतील अशीही चर्चा सुरू आहे.

असा राहिला नितीश कुमार यांचा राजकीय प्रवास...

नितीश हे १९७४ ते १९७७ दरम्यान जय प्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रीय राहीले. तर सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या जनता पक्षातून राजकीय कारकीर्दस सुरूवात केली.

पहिल्यांदा आमदार

१९७७ आणि १९८० च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नितीश कुमार १९८५ मध्ये हरनौत विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले.

पहिल्यांदा खासदार

१९८९ मध्ये पहिल्यांदा ते खासदार झाले. तर अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये १९९८ ते २००१ दरम्यान खात्यांचे केंद्रीय मंत्रीही होते.

कृषीमंत्री

तसेच १९९९ मध्ये त्यांनी कृषी मंत्रालय देखील सांभाळले.

पहिल्यांदा मुख्यमंत्री

दरम्यान त्यांनी साल २००० मध्ये ३ मार्च ते १० मार्च या सात दिवसांत बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषविले.

Nitish Kumar
Bihar Political Crisis : बिहारमध्ये राजकीय भूकंप; नीतीश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

रेल्वेमंत्री

२००१ ते २००४ दरम्यान ते अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये नीतीश रेल्वेमंत्री होते.

२००५ ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

२००४ पर्यंत केंद्रात मंत्री असलेले नीतीश २००५ ला राज्याच्या राजकारणात परतले पुन्हा सक्रीय झाले आणी मुख्यमंत्री बनले.

२००५ मध्ये मुख्यमंत्री

२००५ मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत, नीतीश कुमार बहुमताने प्रथमच मुख्यमंत्री बनले.

२०१० मध्ये मोठा विजय

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला २०१० च्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला. २४३ सदस्यीय विधानसभेत एनडीए आघाडीने २०६ जागा जिंकल्या. जेडीयूला ११५ जागांवर यश मिळाले.

२०१३ मध्ये एनडीएशी फारकत

२०१३ मध्ये प्रथमच ते एनडीएपासून वेगळे झाले. ते भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवल्याने नाराज झाले होते.

२०१४-२०१५ यातील जितन राम मांझी यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ वगळता १९ वर्षांपासून ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत.

Nitish Kumar
नितीश कुमार यांचा आज शपथविधी; सातव्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री

पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

२०१५ विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आरजेडी, काँग्रेस आणि जेडीयू आघाडीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर नीतीश कुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

२०१७ मध्ये महाआघाडीपासून वेगळे

लालू कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर, नीतीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लगेचच भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्री बनले.

२०२० आठव्यांदा मुख्यमंत्री

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत नीतीश कुमार यांच्या पक्षाने केवळ ४३ जागा जिंकल्या, पण भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना जागा जास्त जिंकले असतानाही मुख्यमंत्री केले. यावेळी त्यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

एनडीएशी पुन्हा संबंध तोडले

९ ऑगस्ट २०२२ मध्ये भाजप जेडीयू तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नीतीश यांनी केला. तसेच त्यांनी एनडीएशी पुन्हा संबंध तोडले. यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले होते

महाआघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय

यंदा त्यांनी महाआघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तर भाजपबरोबर जाऊन पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आहे. आता ते नव्यांदा (२० जानेवारी २०२४) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com