Land  Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal land : आदिवासीची जमीन विक्री

Team Agrowon

शेखर गायकवाड

Land of non-tribal farmer : आदिवासी बहूल गावांतील एका गावात शंभू नावाच्या एका बिगर आदिवासी शेतकऱ्याची जमीन होती. आर्थिक अडचणींमुळे शंभूला त्याची जमीन विकायची होती. म्हणून त्याने आपली जमीन सखाराम नावाच्या एका आदिवासी शेतकऱ्याला विकली. शंभूच्या दृष्टीने हा नेहमीचा नॉर्मल (सामान्य) व्यवहार होता.

सखारामने ५ ते ६ वर्षे विकत घेतलेली जमीन कसली. पण त्या जमिनीतून सखारामला समाधानकारक उत्पादन मिळत नसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली. तो कर्जबाजारी झाला. शेवटी सखारामने जमीन विकायचा निर्णय घेतला. सखारामला त्याची जमीन खरेदी करणारा एक शेतकरी भेटला. सखारामने जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला सांगितले की, ‘‘मी जरी आदिवासी शेतकरी असलो, तरी पूर्वी मी ज्या शंभू नावाच्या शेतकऱ्याकडून ही जमीन खरेदी केली होती तो बिगर आदिवासी शेतकरी होता. म्हणून ही जमीन आदिवासी जमीन नाही. त्यामुळे तुम्हाला ही जमीन खरेदी करताना कुणाचीही पूर्व परवानगी लागणार नाही. तुम्ही बिनधास्त हा व्यवहार करू शकता.

जमीन खरेदी करणारा व्यक्ती हा हुशार शेतकरी होता. त्याने स्वत: जाऊन कचेरीत त्या जमिनीबाबत चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की, एकदा आदिवासीच्या नावावर जमीन आली की, ती आदिवासी जमीन ठरते. अशा जमिनीच्या विक्रीसाठी सरकारच्या पूर्व परवानगीची गरज असते. अशी जमीन शेतीसाठी विकत घेता येत नाही. तसेच आदिवासींची जमीन विकायची परवानगी देण्याचे अधिकारदेखील शासनाला आहेत. त्यामुळे तुम्ही ही जमीन खरेदी करू शकत नाही !

सांगायचे तात्पर्य म्हणजे, एखाद्या आदिवासीने बिगर आदिवासी व्यक्तीची जमीन खरेदी केली असली तरीसुद्धा ती जमीन आदिवासी जमीन ठरते. अशी जमीन विकतानादेखील शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. आदिवासी कुटुंबाची जमीन एखाद्याने परवानगी न घेता खरेदी केल्यास, ६० वर्षात ती पुन्हा आदिवासी कुटुंबाला अर्जावरून मिळू शकते!


फुटीचा परिणाम

एका गावात तुकाराम नावाचा एक शेतकरी पत्नी व तीन मुलांसह राहत होता. काही दिवसानंतर तुकारामच्या दोन मुलांना शहरामध्ये नोकरीनिमित्त जावे लागले. तुकारामचा थोरला मुलगा शांताराम गावात शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. काही काळानंतर तुकारामचे निधन झाले. शेतीमधून विशेष काही उत्पन्न मिळत नव्हते. आर्थिकदृष्ट्या शांतारामला शेती करून घर चालविणे परवडत नव्हते. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो कसाबसा आपला संसार चालवत होता.

शहरातील दोन भावंडांना व त्यांच्या पत्नींना वाटायचे की, आपला भाऊ शांताराम एकटाच शेती करतो. शेतीच्या उत्पन्नाचा फायदा सुद्धा तो एकटाच घेतो. शिवाय वर्षाला काहीच मदत व धान्यसुद्धा पाठवीत नाही. त्यामुळे शहरातील दोन भावंडे व गावातील शेती करणारा त्यांचा थोरला भाऊ शांताराम यांच्यामध्ये मतभेद वाढायला लागले.
काही दिवसानंतर शेजारच्या एका शेतकऱ्याने जमीन विकायला काढली. तेव्हा शेती करणाऱ्या शांतारामला असे वाटले की, आपण ही जमीन आपल्या शहरातील भावंडांच्या मदतीने खरेदी करू शकतो. त्यामुळे आपला संसार सुरळीत चालेल. या उद्देशाने शांताराम शहरामधील आपल्या भावांकडे शेती खरेदी करण्यासाठी पैसे मागायला गेला. परंतु, शहरातील भावांनी त्याला नकार दिला. तू एकटाच जमिनीचा फायदा घेतोय. त्यातून आम्हाला काहीच देत नाही, याबाबत त्यांच्यात वाद झाले.

गावाकडच्या दुसऱ्या एका शेतकऱ्याचा सुद्धा त्या जमिनीवर डोळा होता. त्या शेतकऱ्याने वेगवेगळ्या वेळी प्रत्येक भावाला शहरामध्ये भेटून तुमच्या शांतारामला शेतीमधून किती फायदा होतो आणि तो तुम्हाला कसे फसवतो, असे खोटेनाटे सांगून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात आपला स्वत:चा हेतू साध्य करून आपला फायदा करून घेतला.
सांगायचे तात्पर्य म्हणजे खोट्यानाट्या चहाड्या सांगून, आपापसांत फूट पाडणाऱ्यांपासून नेहमी सावध राहायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Damage : ...अखेर पालकमंत्री विखे पाटील पोचले बांधावर

Soybean Yellow Mosaic : सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Rain Update : आखाडा बाळापूर मंडलात अतिवृष्टी

Rain Alert : राज्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

SCROLL FOR NEXT