VNMKV  Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Seed Sale: ‘वनामकृवि’च्या बियाणे विक्रीस आजपासून प्रारंभ

VNMKV Update: परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापनदिनी आजपासून सोयाबीन, तूर, कपाशी, मूग यांसह विविध बियाण्यांची विक्री सुरू झाली आहे. सद्यस्थितीत ५६७ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.

Team Agrowon

Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या व विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित केलेल्या सोयाबीन, तूर, मूग, कपाशी बियाण्याच्या विक्रीचा प्रारंभ विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापनदिनी आज (ता. १८) सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

सोयाबीनच्या विविध वाणांच्या बियाणे बॅगची उपलब्धतेत एमएयूएस-१६२ (७५१ बॅग), एमएयूएस-१५८ (३०० बॅग), एमएयूएस- ७१ (३७६ बॅग) हे उपलब्ध आहेत. तुरीच्या बीडीएन-७१६ (लाल) वाणाच्या ३०० बॅग, बीडीएन-७११ (पांढरी) वाणांच्या ३०० बॅग, बीएसएमआर ८५३ (पांढरी) वाणाच्या ८० बॅग, बीएसएमआर ७३६ (लाल) वाणाच्या १०० बॅग, बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) वाणाच्या ८०० बॅग बियाणे उपलब्ध आहे. ज्वारी (परभणी शक्ती) वाणाच्या एकूण ५०० बॅग तर मूग (बीएम-२००३-२) वाणाच्या ३३० बॅग बियाणे उपलब्ध आहे.

कपाशीच्या ‘एन एच १९०१ बीटी आणि एनएच १९०२ बीटी’ या वाणाचे प्रत्येकी १०० बॅग तर ‘पीए ८१०’ या वाणाच्या बियाण्याच्या २० बॅग उपलब्ध आहेत.भरडधान्यामध्ये राळा (पिडकेव्हि यशश्री), नाचणी (फुले कसारी) या अन्नधान्यांचे एक किलो वजनाच्या पिशव्यामध्ये बियाणे उपलब्ध असून प्रतिकिलो १०० रुपये दर आहेत. सद्यःस्थितीत विक्रीसाठी विविध पिकांचे मिळून ५६७ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यानंतर बीज प्रक्रियेनंतर बियाणे उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले.

पीक प्रतिकिलो दर बियाणे बॅगचे वजन बियाणे बॅग किंमत

सोयाबीन १०० रुपये २६ किलो २६०० रुपये

तूर (गोदावरी) २५० रुपये ६ किलो १५०० रुपये

तूर (गोदावरी) २५० रुपये २ किलो ५०० रुपये

मूग २२० रुपये ६ किलो १३२० रुपये

कपाशी

(बीटी वाण) १०० रुपये १ किलो १०० रुपये

कपाशी

(पीए १०१) ३०० रुपये २.२५ किलो ६७५ रुपये

ज्वारी

(परभणी शक्ती) १२५ रुपये ४ किलो ५०० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT