
Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी विविध संवर्गातील एकूण २ हजार ९८० पदे मंजूर आहेत. परंतु अनेक वर्षांपासून बंद पदभरती आणि प्रत्येक महिन्याला होणारी सेवानिवृत्ती यामुळे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत १ हजार ८६२ पदे (६२.४८ टक्के) रिक्त झाली आहेत.
त्यात चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पदभरतीविना चार नवीन महाविद्यालये सुरू झाले आहेत. त्यामुळे शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांवरील कामांचा ताण आणखीनच वाढला आहे. तोकड्या मनुष्यबळाधारे कामकाजाचा गाडा पुढे रेटणे विद्यापीठ प्रशासनाला कठीण झाले. शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य अडखळत सुरू आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सरळ सेवा भरतीची २ हजार ३१४ आणि तर पदोन्नतीची ६६६ मिळून एकूण २ हजार ९८० पदे मंजूर आहेत. सरळ सेवा अंतर्गत ७१० आणि पदोन्नतीने ४०८ मिळून एकूण १ हजार ११८ पदे भरलेली आहेत. तर सरळ सेवा अंतर्गत १ हजार ६०४ आणि पदोन्नती २५८ मिळून एकूण १ हजार ८६२ पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांमध्ये शिक्षण संचालक, संशोधक संचालक, विस्तार शिक्षण संचालक ही पदे, सहयोगी अधिष्ठातांची (प्राचार्य) पदे, विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकाची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी आदी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
पदभरतीविना नवीन महाविद्यालये सुरू
परळी वैजनाथ (जि. बीड) येथे कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी महाविद्यालय तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथे कृषी महाविद्यालय सुरू झाले आहेत. परंतु तेथे पद भरती केलेली नाही. जवळच्या ठिकाणची महाविद्यालये, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आदी ठिकाणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नवीन महाविद्यालयातील कामकाज चालविले जात आहे.
पदभरतीसाठी पाठपुरावा करणार कोण?
बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक संशोधन तसेच शिक्षण, विस्तार कार्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देत शासनाने विद्यापीठाला पाठबळ देण्याची गरज आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी रिक्त पदांच्या भरतीसाठी शासनाकडे रेटा लावणे आवश्यक आहे. परंतु यामध्ये कोणीही फारसे स्वारस्य दर्शवीत नसल्याचे आजवरचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.